टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताने बांगलादेशविरुद्ध थरारक विजय मिळवत उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. परंतु या मॅच दरम्यान बांगलादेशचा खेळाडू लिटन दास याने अफलातून फटकेबाजी केली. मैदानावरील सामन्यानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने लिटन दासचे विशेष कौतुक केले आहे.
( हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची प्रतीक्षा; ताफ्यात दाखल होणार ९०० मिडी बस)
विराटची खेळाडूवृत्ती
भारताने दिलेल्या १८४ लक्ष्याचा पाठलाग करताना लिटनने २१ चेंडूंमध्ये अर्धशतक केले. लिटनच्या फलंदाजीमुळे डकवर्थ-लुईस-स्टेन पद्धतीनुसार बांगलादेशचा संघ निर्धारित धावसंख्येच्या पुढे होता. सात षटकानंतर सामना थांबला तेव्हाही बांगलादेशचा संघ आघाडीवर होता. लिटनने २७ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या. लिटन धावबाद झाल्यानंतर बांगलादेशला डाव सावरता आला नाही. या सामन्यात विराटला सामनावीर पुरस्कार मिळाला. सामन्यानंतर विराटने लिटन दासचे कौतुक करताना लिटनला आपली बॅट भेट दिली.
बांगलादेशच्या व्यवस्थापकांनी दिली माहिती
आम्ही डायनिंग हॉलमध्ये बसलो असताना विराट कोहली आला आणि त्याने लिटनला बॅट भेट दिली. असे बांगलादेश क्रिकेट संघाचे व्यवस्थापक युनूस यांनी सांगितले आणि त्यांना विराटच्या खेडाळूवृत्तीचे कौतुक केले.
Join Our WhatsApp Community