भारतीय संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली संतापलेला दिसला. बांगलादेशचा खेळाडू मैदानात वेळकाढूपणा करत असल्याने कोहली संतापला.
( हेही वाचा : भारतीयांनी २०२२ मध्ये गुगलवर सर्वाधिक काय सर्च केले माहिती आहे का?)
दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रात बांगलादेशची फलंदाजी सुरू होती. सूर्यप्रकाश कमी झाला होता आणि दिवसातील कमी षटकांचा खेळ शिल्लक होता. अशा परिस्थितीत वेळकाढूपणा करण्यासाठी बांगलादेशचे फलंदाज विविध मार्गांचा वापर करत होते. सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर नजमुल हुसैन शांतो बुटांच्या लेस बांधण्यास सुरुवात केली. यावेळी शांतो बुटाची लेस बांधत असल्याचे विराट कोहलीच्या लक्षात आले. त्यावरून कोहलीने या फलंदाजी खिल्ली उडवत आता जर्सीदेखील काढं, असे कोहलीने वर्णन करत शांतोला सांगितले. कोहलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअखेर भारताने ४ बाद ४५ धावा केल्या आहे. आता हा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताला फक्त १०० धावांची गरज आहे. बांगलादेशकडून मेहंदी हसन मिराजने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या तर शाकीब अल हसनला १ विकेट मिळाली. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर बांगलादेशचा संघ ८० धावांनी पिछाडीवर होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात बांगलादेशच्या संघाला भारताने २३१ धावांमध्ये रोखले. या दुसऱ्या कसोटीमध्ये भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. हा सामना जिंकण्यासाठी भारतापुढे १४५ धावांचे लक्ष्य होते. यातील ४५ धावा टीम इंडियाने केल्या यानंतर आता भारताला जिंकण्यासाठी फक्त १०० धावांची गरज आहे.
Join Our WhatsApp Community— Guess Karo (@KuchNahiUkhada) December 23, 2022