Virat Kohli : कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम

स्टार फलंदाज विराट कोहलीने यंदाच्या विश्वचषकात दोन्ही सामन्यात अर्धशतकं झळकावली आहेत. आणि त्याचबरोबर सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला एक महत्त्वाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

138
Virat Kohli : कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम
ऋजुता लुकतुके

स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात नाबाद ५५ धावांची खेळी केली. आणि त्याचबरोबर एक विक्रमही आपल्या नावावर केला आहे. टी-२० तसंच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धांमध्ये मिळून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज तो ठरला आहे. आता विराटच्या नावावर २३३१ धावा आहेत.

सचिन तेंडुलकरने ४५ एकदिवसीय विश्वचषक सामन्यांमध्ये ५६.९५ धावांच्या सरासरीसह २,२७८ धावा केल्या होत्या. यात ६ शतकं आणि १५ अर्धशतकांचा समावेश होता. अशातच विराटने (Virat Kohli) आतापर्यंत २३३१ धावा केल्या आहेत. विराटने २८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. आणि त्यात २ शतकं आणि ८ अर्धशतकांच्या जोरावर ५०.१८ धावांच्या सरासरीने एकदिवसीय विश्वचषकात ११७८ धावा केल्या आहेत. एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावांच्या यादीत विराट सातव्या क्रमांकावर आहे.

(हेही वाचा – Yogi Adityanath : आतंकवादाचे समथर्न खपवून घेणार नाही – मुख्यमंत्री योगी यांची चेतावणी)

तर टी-२० प्रकारातही विराटने (Virat Kohli) हजारच्या वर धावा केल्या आहेत. एकूण ५५ विश्वचषक सामन्यांमध्ये विराटने २ शतकं आणि २२ अर्धशतकांच्या सहाय्याने २३३१ धावा केल्या आहेत. भारतीय कर्णधार रोहीत शर्माही विराट कोहलीपेक्षा मागे नाही.

रोहीत शर्माने अलीकडेच विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक सात शतकांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याशिवाय विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही रोहीतच्या नावावर आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.