…अखेर ‘विराट’चे ७१ वे शतक! रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने तब्बल ३ तीन वर्षांनंतर अखेर क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. तसेच त्याचे हे T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक आहे. आशिया चषक 2022 मध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता त्याने अफगाणिस्तान विरुद्धच्या लढतीत ६१ बॉलमध्ये नाबाद १२२ धावा केल्या आहेत.

( हेही वाचा : मुंबईत पावसाचा हाहाकार! मध्य रेल्वे ठप्प; प्रवाशांची गैरसोय)

विराट कोहलीला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावण्यासाठी १०३ सामन्यांची वाट पाहावी लागली आणि अखेर त्याने १०४ व्या सामन्यात शतक पूर्ण केले. विराट कोहलीने या सामन्यात ५३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि यादरम्यान त्याने ४ षटकार आणि ११ चौकार फटकावले आहे.

विराट कोहलीने रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला

विराट कोहलीने रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला आणि आता त्याच्या नावावर एकूण ७१ आंतरराष्ट्रीय शतके आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here