‘वन-डे’मध्ये विराटच बेस्ट; विश्वविक्रमापासून तीन शतके दूर

वन-डे च्या क्रिकेट सामन्यांत सध्या शतकांचा राजा म्हणून सचिन तेंडुलकरचे नाव कोरले गेले आहे. त्याने ४९ शतके ठोकली आहेत. या विश्व रेकॉर्डच्या जवळ विराट कोहली पोहचला आहे. रविवार, १५ जानेवारी रोजी श्रीलंकासोबतच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील अंतिम सामन्यात विराटने ४६ वे शतक ठोकले आहे. त्यामुळे विराट आता केवळ ३ शतके विश्व विक्रमापासून दूर राहिला आहे.

विराट कोहलीची १०२ सामन्यातील कामगिरी

वन-डे कारकिर्दीत घरच्या मैदानावर भारताच्या सचिन तेंडुलकरने सर्वाधिक २० शतके झळकावली आहेत. पण आता विराटने थेट सचिनला मागे टाकत घरच्या मैदानावर सर्वाधिक शतके झळकावली आहेत. विराट कोहलीने १०२ सामन्यात ही कामगिरी केली आहे, तर सचिन तेंडुलकरने १६४ सामन्यांत २० शतके घरच्या मैदानावर ठोकली होती. सचिनने पहिल्या वन-डेमध्ये शतक झळकावत सचिनच्या या विक्रमाची बरोबरी केली होती. पण श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने शतक झळकावत सचिनला मागे टाकले आहे. आपल्या शानदार एकदिवसीय कारकिर्दीत घरच्या मैदानावर कोहलीने अवघ्या ९९ डावांमध्ये २० शतके झळकावत ही मोठी कामगिरी केली आहे. विराटने तिसऱ्या वन-डे सामन्यात १ षटकार आणि १० चौकार मारत ८५ चेंडूत १०० धावा केल्या. तर विराटने त्याने ४८ चेंडूत आपले अर्धशतक झळकवले. महान फलंदाजांपैकी एक, सचिन तेंडुलकरच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके आहेत. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत ४६३ सामने खेळले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here