- ऋजुता लुकतुके
भारतीय संघ गेले काही दिवस पर्थमध्ये पहिल्या कसोटीची जोरदार तयारी करत आहे. त्याचवेळी संघ सहकारी वेळ घालवण्यासाठी काही मजेशीर खेळही खेळताना दिसतात. बीसीसीआयने अलीकडेच असा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात भारतीय खेळाडूंची सरावानंतरची चेष्टा मस्करी आणि एकमेकांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध दिसतात. अशाच एका मजेशीर प्रश्नोत्तराच्या तासात विराट कोहली (Virat Kohli), सर्फराज खान आणि मोहम्मद सिराज सहभागी झाले होते.
खेळाडू एकमेकांशी बोलत असताना सर्फराज आणि मोहम्मद सिराज यांनी विराट कोहलीचं (Virat Kohli) वर्णन एका शब्दांत काय कराल, या प्रश्नाचं उत्तर ‘दिग्गज’ असं दिलं आहे.
(हेही वाचा – Air India: ऐकावं ते नवल! ड्युटी संपली म्हणुन International flight Jaipur मध्ये सोडून पायलट गेले निघून)
#TeamIndia Questions..
..And Answers❗️
📸 Presenting India’s Headshots Session ft. 𝗔𝘀𝗸 𝘁𝗵𝗲 𝗡𝗲𝘅𝘁 𝗢𝗻𝗲 😎
WATCH 🎥🔽 – By @RajalArora | #AUSvIND https://t.co/POrSOOezHS
— BCCI (@BCCI) November 18, 2024
सध्या फॉर्मशी झगडणाऱ्या विराट कोहलीला (Virat Kohli) ऑस्ट्रेलिया या त्याच्या लाडक्या देशात पुन्हा फॉर्म गवसेल अशी भारतीय संघ आणि चाहत्यांची अपेक्षा आहे. कारण, इथेच त्याने जागतिक दर्जाचा फलंदाज अशी आपली ओळख निर्माण केली. २०११ आणि पुन्हा २०१३ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला. इथं १३ कसोटींत त्याने १,३५२ धावा केल्या आहेत.
त्यामुळेच विराटला (Virat Kohli) संघ सहकाऱ्यांकडूनही प्रेम आणि आदर मिळाला आहे. अशाच एका बीसीसीआयच्या व्हिडिओत के. एल. राहुलनेही फोनमधील सगळ्यात प्रसिद्ध कॉन्टॅक्ट कुठला या प्रश्नाचं उत्तर देताना विराट कोहलीचं नाव घेतलं आहे. असा विरंगुळ्याच्या क्षणांबरोबरच भारतीय संघाचा नेट्समध्ये जोरदार सरावही सुरू आहे. २२ नोव्हेंबरपासून पहिली पर्थ कसोटी सुरू होत आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community