- ऋजुता लुकतुके
विराट कोहलीचा (Virat Kohli) करिश्मा जागतिक क्रिकेटमध्ये आजही कायम आहे. ऑस्ट्रेलियातील एका क्रिकेट लिलावात त्याचीच प्रचिती आली. ऑस्ट्रेलियातल्याच ग्रेग चॅपेल क्रिकेट केंद्रात किंग कोहलीने वापरलेली एक बॅट विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे आणि तिची किंमत आहे तब्बल १.६४ लाख रुपये. ऑस्ट्रेलियातील एक पॉडकास्टर आणि युट्यूबर नॉर्मन कॉचनेकने या केंद्रातून एक व्हिडिओ केला आहे आणि तिथे ही बॅट आणि तिचं महत्त्वही त्याने सांगितलं आहे. कोहली वापरत असलेली एमआरएफ जिनिअस ग्रँड किंग असं लिहिलेली ही बॅट आहे. या बॅटवर विराट कोहलीची सही आहे.
बॅटबरोबर त्याची डॅफल बॅगही आहे. सध्या खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीची (Virat Kohli) ऑस्ट्रेलियातील लोकप्रियता या किमतीतून दिसते.
(हेही वाचा – Chhattisgarh मध्ये झालेल्या चकमकीत १० नक्षली ठार; अनेक शस्त्र जप्त)
View this post on Instagram
बोर्डर-गावस्कर चषकातील पहिली कसोटी पर्थला सुरू झाली आहे. विराट कोहलीचा (Virat Kohli) खराब फॉर्म सुरूच असून पहिल्या डावात तो ५ धावा करून हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. यावर्षी कोहली सलग ६ कसोटींत ११ डावांत अपयशी ठरला आहे. त्याच्या धावा आहेत अवघ्या १०२. न्यूझीलंड विरुद्ध बंगळुरूमध्ये केलेल्या ७० धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. पण, ऑस्ट्रेलियात कोहलीची कामगिरी नेहमीच चांगली झाली आहे.
इथं त्याने १३ कसोटींत १,३४२ धावा केल्या आहेत आणि त्याची सरासरीही ६० धावांच्या वर आहे. त्यामुळे इथं त्याला फॉर्म गवसेल आणि त्याच्याकडून धावा होतील अशी भारतीय संघाला आशा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community