Virat Kohli : रेल्वे विरुद्धच्या सामन्यासाठी विराट कोहली दिल्ली रणजी संघात दाखल

विराटने दिल्ली संघाबरोबर सरावही सुरू केला आहे.

30
Virat Kohli : रेल्वे विरुद्धच्या सामन्यासाठी विराट कोहली दिल्ली रणजी संघात दाखल
Virat Kohli : रेल्वे विरुद्धच्या सामन्यासाठी विराट कोहली दिल्ली रणजी संघात दाखल
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) दिल्लीच्या रणजी संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे १२ वर्षांनंतर तो पुन्हा रणजी खेळणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. ३० तारखेला रेल्वे विरुद्धच्या सामन्यात विराट खेळणार आहे. पण, आधीचा सामना खेळलेला ऋषभ पंत (Rishabh Pant) यावेळी विश्रांती घेणार आहे. संघाचा कर्णधार आयुष बदोनीच (Ayush Badoni) असेल. विराट संघाबरोबर दिल्लीत दाखलही झाला आहे.

विराटचा समावेश आणि ऋषभची विश्रांती सोडली तर दिल्ली संघात फारसे बदल नाहीत. विराट १२ वर्षांनंतर रणजी सामना खेळणार आहे. २८ जानेवारीला अरुण जेटली मैदानावर दिल्लीच्या संघाने सराव केला तेव्हा विराट संघाबरोबर होता. त्यापूर्वी ३६ वर्षीय कोहली (Virat Kohli) मुंबईत संजय बांगरबरोबर सराव करत होता.

(हेही वाचा – BMC : आयकर विभागाने महापालिकेकडे मागितली हाय वे कंस्ट्रक्शन कंपनीची कागदपत्रे)

विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट सध्या कसोटी क्रिकेटमध्ये चालत नाहीए. शेवटच्या ९ डावांमध्ये त्याने फक्त १९० धावा केल्या आहेत. इतरही फलंदाज फ्लॉप ठरल्यामुळे बीसीसीआयने (BCCI) राष्ट्रीय संघातील खेळाडूंना देशांतर्गत सामने खेळणं अनिवार्य केलं आहे. ऑस्ट्रेलियातून परतल्यावर रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जाडेजा आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) आपापल्या राज्याकडून रणजी सामना खेळले. पण, विराट मानेच्या दुखण्यामुळे हा सामना खेळू शकला नाही. आता तो ३० तारखेचा सामना खेळणार आहे.

यंदाचा रणजी हंगाम दिल्लीसाठी खराब गेला आहे. ६ सामन्यांपैकी फक्त एक जिंकत ते गुणतालिकेत तळाला आहेत. तर डी गटात रेल्वेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट यापूर्वी २०१२ मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध आपला शेवटचा रणजी सामना खेळला होता.

विराट बरोबरीने के एल राहुलही कर्नाटकसाठी रणजी सामना खेळणार आहे. आधीच्या सामन्यात त्यानेही दुखापतीमुळे विश्रांती घेतली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.