Virat Kohli Injury Update : दुखापतीमुळे विराट कोहली पुढचा सामना खेळणार की नाही; मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर काय म्हणाले?

Virat Kohli Injury Update : गुजरातविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना विराटच्या बोटाला चेंडू लागला होता.

47
Virat Kohli Injury Update : दुखापतीमुळे विराट कोहली पुढचा सामना खेळणार की नाही; मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर काय म्हणाले?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात चिन्नास्वामी मैदानात झालेल्या सामन्यात स्टार खेळाडू विराट कोहलीच्या बोटावर चेंडू बसला होता. त्यानंतर विराट कोहली विव्हळताना दिसला. चेंडू त्याच्या बोटावर बसला आणि पुढे सीमारेषेपार झाला. पण, सामना संपल्यानंतर विराटच्या दुखापतीवर संघाचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी अपडेट दिला आहे. ‘विराट कोहली बरा आहे. काळजी करण्यासारखं काहीही नाही,’ असं म्हणत फ्लॉवर यांनी हा प्रश्न निकालात काढला. त्या सामन्यांत गुजरात टायटन्सनी बंगळुरू संघाचा ८ गडी राखून पराभव केला. बंगळुरूची विजयी मालिका खंडित केली. (Virat Kohli Injury Update)

(हेही वाचा – Nanded Accident : १५ वर्षाच्या मुलाच्या हाती दिलं ट्रॅक्टरचं स्टेअरिंग ; विहिरीत कोसळून ८ शेतमजुरांचा मृत्यू)

बंगळुरू संघाने गुजरात विरुद्ध विजयासाठी १७० धावांचं आव्हान समोर ठेवलं होतं. जोस बटलर तसंच शर्फन रुदरफोर्ड आणि साई सुदर्शन यांच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर गुजरातने बंगळुरूचा आरामात पराभव केला. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर सुरुवातीला बंगळुरूची फलंदाजी अडखळली. खुद्द विराट कोहलीने शानदार चौकार मारत सुरुवात चांगली केली होती. पण, त्यानंतर चेंडू पूल करण्याच्या नादात त्याने सीमारेषेवर झेल दिला. तो फक्त ७ धावा करून बाद झाला. मोहम्मद सिराजने १९ धावांमध्ये ३ बळी घेत बंगळुरूची आघाडीची फळी कापून काढली. (Virat Kohli Injury Update)

(हेही वाचा – राज्यभरातील परिवहन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याचे मंत्री Pratap Sarnaik यांचे निर्देश)

त्यानंतर सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना विराटने एक चौकार अडवण्याचा प्रयत्न केला. पण, रुदरफोर्डने ताकदीने मारलेला हा फटका विराटच्या बोटाची वरची कडा घेऊन सीमारेषेपार गेला. विराट बोट हातात पकडून विव्हळताना दिसला. मैदानावर फिजीओंनी त्याच्या बोटावर त्वरित उपचार केले. विराटने सामना पूर्ण केला. पण, ही दुखापत नेमकी किती गंभीर आहे हा प्रश्न सगळ्यांच्यात मनात होता. त्यावर फ्लॉवर यांनी ही चांगली बातमी दिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पुढील सामना मुंबईत वानखेडे स्टेडिअमवर सोमवारी होणार आहे. (Virat Kohli Injury Update)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.