विराट कोहली (Virat Kohli) सध्या वर्ल्ड कपमध्ये आपल्या बॅटिंगची जादू दाखवत आहे. सचिन तेंडूलकर नंतर कोण? असा प्रश्न पडत असतानाच विराट कोहलीचा उदय झाला आणि त्याने भारतीय संघात स्वतःची जागा निश्चित केली. विराट कोहलीने भारतासाठी एकूण ६८ टेस्ट सामन्यांचे नेतृत्व केले, ज्यात त्याने ४० सामने जिंकले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने १७ टेस्ट सामने गमावले तर ११ सामने अनिर्णित राहिले. भारताच्या कोणत्याही कर्णधाराने इतके टेस्ट सामने जिंकलेले नाहीत. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील ९५ सामन्यांपैकी टीम इंडियाने ६५ सामने जिंकले आहेत. त्यामुळे विराट कोहली हा कर्णधार म्हणूनही यशस्वी ठरला आहे. चला तर जाणून घेऊया या महान खेळाडूबद्दल.
विराट कोहली (Virat Kohli) चा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीत झाला. दिल्लीच्या रस्त्यावर खेळताना त्याला क्रिकेटची आवड निर्माण झाली. त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट अकादमीमध्ये दाखल केले जेथे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी त्याला प्रशिक्षण दिले. पॉली उमरीगर आणि विजय मर्चंट टूर्नामेंटमध्ये खेळल्यानंतर विराटने दिल्लीच्या प्रथम श्रेणी क्रिकेट संघात प्रवेश केला आणि नंतर त्याला भारताच्या अंडर-१९ संघाचा भाग होण्याची संधी मिळाली. लालचंद राजपूत यांच्या प्रशिक्षणांतर्गत असताना त्यांने इंग्लंड आणि पाकिस्तानचे दौरे केले जेथे त्यांच्या फलंदाजीचे खूप कौतुक झाले.
विरेंद्र सेहवाघ आणि सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या महान खेळाडूंची कमतरता टीम इंडियाला सतावत होती. ही जागा विराट कोहली (Virat Kohli) ला मिळाली. कोहलीने १८ ऑगस्ट २००८ रोजी भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो विश्वचषक पदार्पणात २०११ मध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. वयाच्या २२ व्या वर्षी सलग दोन एकदिवसीय सामन्यात शतके ठोकणारा तिसरा भारतीय खेळाडू (सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना नंतर) ठरला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०००, ३०००, ४००० आणि ५००० धावा करणारा भारतीय खेळाडू म्हणजे विराट कोहली.
(हेही वाचा Lalit Patil ला पळून जाण्यासंबंधी केलेले आरोप ससूनच्या अधिष्ठातांनी फेटाळले; म्हणाले…)
त्याचबरोबर सलग २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद धावा करणारा खेळाडू म्हणून त्याला आपण ओळखतो. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद ७,५०० धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे डॉन ब्रॅडमन आणि रिकी पाँटिंगनंतर त्रिशतक करणारा तो तिसरा खेळाडू आहे. तसेच त्याने डॉन ब्रॅडमन, ग्रॅम स्मिथ, मायकेल क्लार्क यांसारख्या खेळाडूंचा चार द्विशतकांचा विक्रम मोडला आहे. विशेष म्हणजे जे कोणालाही जमलं नाही ते त्याने करुन दाखवलंय. एका वर्षात नऊ टेस्ट सामने जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार आहे.
त्याचबरोबर त्याने एका वर्षात टेस्ट सामन्यांमध्ये १००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. राहुल द्रविडनंतरचा हा पहिला भारतीय खेळाडू आहे. तसेच परदेशी भूमीवर द्विशतक झळकावणारा तो पहिला भारतीय टेस्ट कर्णधार ठरला आहे. त्याची विजयी घोडदौड सुरुच आहे. त्याच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार येत गेले. मात्र आपल्या जबरदस्त आत्मविश्वासामुळे आणि खेळामुळे त्याने आपली जागा संघात कायम ठेवली आहे.
विराट कोहलीला त्याचे मित्र लाडाने ’चिकू’ अशी हाक मारतात. रन मशीन म्हणूनही तो ओळखला जातो. त्याच्या फॅन्सने त्याला ’Goat’ ही उपाधी दिली आहे. याचा अर्थ Great of all time असा आहे. कव्हर ड्राइव्ह आणि फ्लिक शॉट त्याचे आवडते शॉट्स आहेत. २०१७ तो अनुष्का शर्मा सोबत विवाहबद्ध झाला.
Join Our WhatsApp Community