Virat Kohli ला एकदिवसीय क्रिकेटमध्ये खुणावतोय मोठा विक्रम; १४,००० धावा पूर्ण करण्यासाठी ‘इतक्या’ धावा बाकी

Virat Kohli : बुधवारी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे

46
Virat Kohli ला एकदिवसीय क्रिकेटमध्ये खुणावतोय मोठा विक्रम; १४,००० धावा पूर्ण करण्यासाठी 'इतक्या' धावा बाकी
Virat Kohli ला एकदिवसीय क्रिकेटमध्ये खुणावतोय मोठा विक्रम; १४,००० धावा पूर्ण करण्यासाठी 'इतक्या' धावा बाकी
  • ऋजुता लुकतुके 

भारत आणि इंग्लंडचे संघ तिसऱ्या एकदविसीय सामन्यासाठी बुधवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आमने सामने येतील. आणि यावेळी भारतीय संघ ३-० असं निर्भेळ यश मिळवण्यासाठी खेळेल. आणि त्याचवेळी संघाला स्टार फलंदाज विराट कोहली फॉर्ममध्ये परतावा अशी आशा असेल. याच मैदानावर भारतीय संघाने २०२३ च्या नोव्हेंबर महिन्यात एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना गमावला होता. तिथे पुन्हा एकदा विजय मिळवण्याचा संघाचा प्रयत्न असेल. कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म परतला आहे. आता चॅम्पियन्स करंडकापूर्वी विराटही फॉर्ममध्ये परतावा अशीच संघाची इच्छा असेल. (Virat Kohli)

(हेही वाचा- राम मंदिराचे मुख्य पुजारी Acharya Satyendra Das यांचे निधन)

रोहितने कटकमध्ये ९० चेंडूंत ११९ धावांची खेळी रचताना ७ षटकार आणि १२ चौकारांची आतषबाजी केली. पण, त्याचवेळी विराट कोहली मात्र ६ धावांवर बाद झाला. मागच्या काही डावांमध्ये कोहली एखादाच चांगला फटका खेळून झटपट बाद होत आहे. तो चाचपडत खेळत नाही. पण, त्याच्या धावाही होत नाहीएत. ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. एकदिवसीय क्रिकेटमधला एक मोठा मापदंड त्याला खुणावतो आहे. १४,००० धावांचा टप्पा पार करण्यासाठी त्याला आणखी ८९ धावांची गरज आहे. (Virat Kohli)

 स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स करंडक खेळणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे गोलंदाजीत मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या यांच्यावर तेज गोलंदाजीची धुरा असेल. तर वरुण, वॉशिंग्टन, जडेजा, अक्षर आणि कुलदीप हे पाच फिरकीपटू संघात आहेत. अहमदाबादमध्ये रात्रीच्या वेळी पडणाऱ्या दवामुळे खेळपट्टी फलंदाजांना धार्जिणी असते असं आधी दिसून आलं आहे. त्यामुळे फलंदाजांनी मोठी धावसंख्या रचणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी अनुभवी रोहित आणि विराटवर मोठी जबाबदारी असणार आहे.

(हेही वाचा- Pune News : विद्यार्थ्याने पेपरला बारकोड लावला अन् मारली दुसऱ्या मजल्यावरुन उडी ; पुण्यातील धक्कादायक प्रकार)

कटक सामन्यातील अंतिम अकरा जणांचा संघच कायम ठेवला जाईल अशी शक्यता आहे. रवींद्र जडेजा बॅट आणि चेंडूनेही अष्टपैलू कामगिरी करत आहे. तर श्रेयस अय्यरही फॉर्ममध्ये आहे. के. एल .राहुलकडून मोठी खेळी झाली तर चॅम्पियन्स करंडकापूर्वी तो मोठा दिलासा असेल. भारतीय संघ १५ फेब्रुवारीला दुबईला रवाना होणार आहे. भारताचे चॅम्पियन्स करंडकातील सामने दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर होणार आहेत. २० तारखेला भारताची गाठ बांगलादेशशी पडेल.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.