Virat Kohli : विराट कोहली तिसरी आणि चौथी कसोटीही खेळणार नाही?

राजकोट आणि रांचीला होणाऱ्या आगामी कसोटीही विराट खेळणार नाही असं विश्वसनीयरित्या सांगितलं जातंय. 

239
IPL 2024 : विराट कोहली आयपीएल खेळणार का?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) राजकोट आणि रांचीच्या पुढील दोन कसोटीही खेळणार नाही, असं ईएसपीएन क्रिकइन्फोनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. याआधीच्या दोन कसोटींतूनही विराट वैयक्तिक कारणांमुळे बाहेर राहिला होता. आता आणखी दोन कसोटीत तो खेळला नाही तर भारतीय संघाच्या (Indian team) मधल्या फळीसाठी ही नक्कीच काळजीची गोष्ट आहे. इतकंच नाही तर पाचव्या धरमशाला कसोटीसाठीही विराट उपलब्ध होईल की नाही, हे अजून स्पष्ट नाही. (Virat Kohli)

इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी तीन दिवस आधी २२ जानेवारीला विराट भारतीय संघात (Indian team) सहभागी होण्यासाठी हैद्राबादला पोहोचलाही होता. पण, त्याच दिवशी संघ प्रशासनाला भेटून तो तिथून निघून गेला. त्यानंतर बीसीसीआयने (BCCI) पत्रक काढून विराट (Virat Kohli) पहिल्या दोन कसोटींसाठी उपलब्ध नसल्याचं कळवलं. पत्रक काढतानाही, बीसीसीआयने यावर कुणीही उलटसुलट चर्चा करू नये असं आवाहन मीडिया आणि चाहत्यांना केलं होतं. (Virat Kohli)

विराटची (Virat Kohli)  पत्नी अनुष्का गरोदर आहे. आणि विराट तिच्याबरोबर राहू इच्छितो, असं विराटचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमधील मित्र एबी डिव्हिलिअर्सने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. विराट (Virat Kohli) सध्या भारतात नाहीए. (Virat Kohli)

(हेही वाचा – HONOR X9B 5G : ऑनर कंपनीचा भगव्या रंगातील ‘हा’ फोन तुम्ही पाहिला का?)

सिराज संघात परतणार

तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोटला सुरू होणार आहे. त्यापूर्वी भारतीय निवड समिती संघ निवडीसाठी येत्या काही दिवसांत भेटणार आहे. दुसऱ्या कसोटीत संघाबाहेर बसलेला मोहम्मद सिराज संघात परतणार हे नक्की आहे. तर के एल राहुल आणि रवींद्र जडेजाही बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतींवर उपचार घेत आहेत. आणि दोघांच्या फीजिओंनी आपला अहवाल अजून दिला नसला तरी दोघांची तब्येत सुधारत असल्याचं समजतंय. (Virat Kohli)

कसोटीसाठी अजून एक आठवडा अवकाश असल्यामुळे दोघंही वेळेत तंदुरुस्त होतील, असाच अंदाज आहे. रवींद्र जडेजाला पहिल्या कसोटीच्या शेवटच्या डावांत फलंदाजी करताना मांडीच्या दुखापतीचा त्रास सुरू झाला. तर के एल राहुलनेही कंबर दुखत असल्याची तक्रार केली होती. (Virat Kohli)

खेळाडूंच्या उपलब्धतेनुसार संघाची मधली फळी उभारणं आणि बुमरा, सिराजबरोबर तिसऱ्या तेज गोलंदाजाला तयार करणं हे निवड समितीसमोरचं आव्हान असणार आहे. (Virat Kohli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.