
- ऋजुता लुकतुके
किंग कोहली (Virat Kohli Net Worth) या नावाने ओळखला जाणारा भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली फलंदाजीत जगात नंबर वन आहे तसाच कमाईच्या बाबतीतही तो नंबर वन क्रिकेटपटू आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींपेक्षाही त्याची कमाई जास्त आहे. त्याचा कमाईचा मुख्य स्त्रोत क्रिकेट हा असला तरी क्रिकेट बाहेरचे कार्यक्रम आणि जाहिराती यातूनही त्याला बक्कळ पैसे मिळतात. एका रिपोर्टनुसार, त्याची एकूण कमाई आणि मालमत्ता सध्याच्या घडीला १,०9० कोटी रुपयांच्या आसपास आहे. (Virat Kohli Net Worth)
(हेही वाचा- Solapur: बागलवाडी येथे तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न, तरुणावर गुन्हा दाखल)
आधी विराटची क्रिकेटमधील कमाई पाहूया. तो भारताकडून कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तीनही प्रकारात खेळतो. त्यासाठी बीसीसीआयकडून त्याला कराराची काही ठरावीक रक्कम मिळते. एका कसोटीसाठी त्याला १५ लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख रुपये आणि टी-२० सामन्यासाठी ३ लाख रुपये मिळतात. याशिवाय बीसीसीआयकडून मध्यवर्ती कराराचे त्याला वार्षिक ७ कोटी रुपये मिळतात. तसंच आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून त्याला १५ कोटी रुपये मिळतात. या क्रिकेटच्या कमाई व्यतिरिक्त त्याची आणखी मोठी कमाई जाहिरातीतून होते. (Virat Kohli Net Worth)
Virat Kohli’s net worth – 1,090cr. (Fin HQ). pic.twitter.com/Mkwrmjcjul
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 8, 2024
विराट कोहली सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. तिथूनही त्याला जाहिराती मिळतात. विराट सध्या मुंबईत अंधेरी परिसरात वास्तव्याला आहे. आपली पत्नी अनुष्का आणि वामिका, अकाय ही त्यांची दोन मुलं यांच्याबरोबर विराट एका आलिशान फ्लॅटमध्ये राहतो. त्याची किंमत ३४ कोटी रुपयांच्या आसपास आहे. याशिवाय विराटचं मूळ गाव दिल्लीत गुरुग्राममध्ये त्याने एक मोठी हवेली बांधली आहे. तिची किंमतच १०० कोटी रुपये आहे. कारण, ती एक इस्टेट आहे. (Virat Kohli Net Worth)
(हेही वाचा- Supreme Court: कोणतीही जाहिरात प्रसारित करण्यापूर्वी स्वघोषणा पत्र जारी करावं, सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश)
विराटने आपले पैसे काही स्टार्ट अपमध्ये गुंतवले आहेत. मोबाईल गेमिंग, फॅशन वेअर आणि फिनटेक या क्षेत्रातील या स्टार्ट अप कंपन्या आहेत. या गुंतवणुकीतूनही विराटला पैसा मिळतो. (Virat Kohli Net Worth)
विराट लक्झरी कारचा शौकिन आहे. त्याच्याकडे ऑडीपासून ते बेंटले फ्लायिंग स्टार पर्यंत अनेक लक्झरी कार आहेत. यातील बेंटलेची किंमत ४ कोटी रुपयांपर्यंत आहे. शिवाय त्याच्याकडे रेंजरोव्हरही आहे. त्याच्या सगळ्या कारची किंमतच ३० कोटी रुपयांच्या आसपास आहे. (Virat Kohli Net Worth)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community