- ऋजुता लुकतुके
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि बीसीसीआय अधिकाऱ्यांची मुंबईत एक गुप्त बैठक झाली आहे. यात टी-२० विश्वचषकासाठीच्या रणनीतीवर चर्चा झाली. (Virat Kohli T20 Future)
विराट कोहली हा भारताचा मागच्या १५ वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे. सचिन तेंडुलकरचे फलंदाजीतील सर्व विक्रम तो मागे टाकेल असं त्याच्याबद्दल बोललं जातं. आताही विश्वचषक स्पर्धेत त्याने ३ शतकांसह ७६५ धावा करत सर्वात यशस्वी फलंदाज होण्याचा मान मिळवला. पण, आता पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत विराट कोहली भारतीय संघात असण्याची शक्यता कमीच आहे. (Virat Kohli T20 Future)
(हेही वाचा – Cyclone Michaung : चेन्नईत झालेल्या नुकसानीचा राजनाथ सिंह यांनी घेतला हवाई आढावा)
दैनिक जागरण समुहाच्या वेबसाईटवर अशाप्रकारची एक बातमी देण्यात आली आहे. विश्वचषकासाठीच्या अकरा जणांच्या संघात तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज म्हणून बीसीसीआय दुसऱ्याच एका खेळाडूचा विचार करत असल्याचं या बातमीत म्हटलं आहे. (Virat Kohli T20 Future)
भारतीय कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि बीसीसीआयचे पदाधिकारी यांच्यात टी-२० विश्वचषकाच्या तयारीवर एक बैठक झाली. मुंबईत झालेली ही बैठक ५ तास चालली. या विश्वचषकापूर्वी भारतीय संघ खूपच कमी टी-२० मालिका खेळत असल्याबद्दलही या बैठकीत चर्चा करण्यात आली. कारण, दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तीन टी-२० आणि त्यानंतर अफगाणिस्तान विरुद्धच्या ३ टी-२० इतकेच सामने यंदा भारतीय संघ खेळणार आहे. त्यातही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित, विराट आणि जसप्रीत बुमरा हे ज्येष्ठ खेळाडू खेळत नाहीएत. (Virat Kohli T20 Future)
आयपीएलमध्ये बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सकडून खेळताना विराटने भक्कम कामगिरी केली तर त्याचा विचार होऊ शकेल. पण, इथंही तो सलामीला खेळत असल्यामुळे बीसीसीआय द्विधा मनस्थितीतच आहे. कारण, सलामीला रोहित बरोबर शुभमन गिल किंवा यशस्वी जयसवाल यांचं नाव जवळ जवळ निश्चित आहे. पण, विराटचं तिसरं स्थान मात्र धोक्यात आहे. (Virat Kohli T20 Future)
(हेही वाचा – Cyclone Michaung : चेन्नईत झालेल्या नुकसानीचा राजनाथ सिंह यांनी घेतला हवाई आढावा)
विराटच्या जागी ईशान किशन?
बीसीसीआयने आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित असलेला एक पदाधिकारी दैनिक जागरणच्या प्रतिनिधीशी थेट बोलल्याचा दावा वेबसाईटने केला आहे. त्यानुसार, तिसऱ्या स्थानासाठी बीसीसीआय ईशान किशनच्या नावाचा विचार करत असल्यांच दैनिक जागरणच्या बातमीत म्हटलं आहे. (Virat Kohli T20 Future)
ईशान किशनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत सातत्याने चांगल्या धावा जमवल्या आहेत आणि त्याचा फटकेबाजीचा वेगही जास्त आहे. त्यामुळे ईशान किशनचा विचार होत आहे. तर कर्णधारपदावर रोहितने कायम रहावं असा बीसीसीआयचा विचार आहे. (Virat Kohli T20 Future)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community