-
ऋजुता लुकतुके
बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार राजीव शुक्ला आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांनी नुकतीच नवी दिल्लीत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली. विराटचा रेल्वेविरुद्धचा रणजी सामना सुरू होण्यापूर्वी ही भेट झाली असावी. शुक्ला यांनी नुकतीच एका ट्विटद्वारे ही माहिती उघड केली आहे. सध्या रणजी सामन्यासाठी विराट कोहली दिल्लीत आहे. ‘उपराष्ट्रपती जगदीप धनखडजींची भेट घेण्याचं सौभाग्य लाभलं आणि त्यावेळी विराट कोहलीही सोबत होता,’ असं ट्विट राजीव शुक्ला यांनी केलं आहे.
(हेही वाचा – Union Budget 2025 : रेल्वे अर्थसंकल्पातून हाय-स्पीड रेल्वे, वंदे भारत निर्मितीची अपेक्षा; रेल्वे अर्थसंकल्पातून काय अपेक्षा?)
Lovely to meet honourable Vice President of India Shri Dhankad ji . Glad to have the company of @imVkohli pic.twitter.com/7qPmkNljO6
— Rajeev Shukla (@ShuklaRajiv) January 30, 2025
शुक्रवारी नवी दिल्लीत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्याचवेळी विराट कोहली (Virat Kohli) १३ वर्षांनंतर आपला पहिला रणजी सामना खेळत आहे. या दोन्ही घटनांमुळे दिल्लीत वेगळीच हलचल आहे. विराटचा सामना पाहण्यासाठी बीसीसीआय आणि दिल्ली असोसिएशनचे पदाधिकारी तसंच चाहत्यांनीही मोठी गर्दी केली आहे. पहिल्या दिवशी १५,००० पेक्षा जास्त प्रेक्षकांनी हा सामना पाहण्यासाठी अरुण जेटली मैदानावर गर्दी केली होती.
(हेही वाचा – Railway TC Body Camera: विनातिकीट प्रवाशांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर; तिकीट तपासकांना मिळणार बॉडी कॅमेरा )
शुक्रवारी चाहत्यांना विराटची (Virat Kohli) फलंदाजी पाहायलाही मिळू शकते. यापूर्वी २०१२ मध्ये विराट आपला शेवटचा रणजी सामना खेळला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने खेळाडूंना रणजी सामने खेळणं अनिवार्य केलं होतं. त्यानंतर रोहित, रिषभ, शुभमन, जडेजा, राहुल यांच्यासह विराटनेही रणजी सामना खेळायला प्राधान्य दिलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बोर्डर-गावस्कर मालिकेत ५ कसोटींत विराटने २५ धावांच्या सरासरीने फक्त २९० धावा केल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community