- ऋजुता लुकतुके
विराट कोहली (Virat Kohli) आता आधुनिक क्रिकेटमधील भारताचाच नाही तर जगातील अव्वल दिग्गज क्रिकेटपटू आहे. त्याची तुलना अभावितपणे सचिन तेंडुलकरशी केली जाते. विराट हा असा खेळाडू आहे ज्याने भारतीय ड्रेसिंग रुममध्ये सचिन तेंडुलकर बरोबर बराच वेळ घालवला आहे. सचिनला ड्रेसिंग रुममध्ये ‘पाजी’ म्हणून संबोधलं जायचं. म्हणजे पंजाबीत वडील. विराटचे ड्रेसिंग रुममधले सुरुवातीचे दिवस सचिनला पारखून बघण्यातच जायचे.
अलीकडे एका मुलाखतीत त्याने पहिल्या भेटीचा गंमतीशीर किस्सा सांगितला. ‘मी आधी श्रीलंकेत खेळलो होतो. पण, तेव्हा सचिन पाजी संघाबरोबर नव्हते. २००८ मध्ये मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा आधीपासूनच उत्सुकता होती की सचिन पाजींबरोबर बोलायला मिळेल का, काय होईल आणि जेव्हा मी त्यांना त्यांच्या खुर्चीवर बसलेलं पाहिलं, मी जाऊन त्यांच्यासमोर लोटांगण घातलं,’ विराट (Virat Kohli) हसत हसत सांगत होता.
Virat Kohli talking about the prank when he meets Sachin Tendulkar for the first time.
– He said “Main pairon main gir gaya Sachin Paaji ke”. ❤️😂pic.twitter.com/ocxbbvBinn
— Tanuj Singh (@ImTanujSingh) November 7, 2024
(हेही वाचा – Accident News: Mumbai-Pune Expressway वर भीषण अपघात! खासगी बसची ट्रकला धडक, ३८ प्रवासी…)
ही खरंतर विराटची (Virat Kohli) इतर संघ सहकाऱ्यांनी केलेली चेष्टा मस्करी होती. पण, तेव्हा ना विराटला हे माहीत होतं, ना सचिनला. ‘सचिन पाजींना काहीच माहीत नव्हतं. ते एकदम मागे झाले आणि म्हणाले, हे काय करतोस? मी इतकंच म्हणालो, मला सांगितलंय, असं करावं लागतं पहिल्या दिवशी म्हणून,’ विराटबरोबर आता सगळेच हसत होते. विराटला इरफान पठाण आणि मुनाफ पटेल यांनी सांगितलं होतं की, संघात नवीन आलेल्या खेळाडूला सचिन तेंडुलकरला पहिल्या दिवशी मुजरा करावा लागतो. त्याप्रमाणे विराटने सचिनसमोर लोटांगण घातलं होतं.
विराटची गंमत झाली असली आणि सहकारी त्याला हसत असले तरी विराटला लक्षात राहिली आहे ती सचिनची प्रतिक्रिया. ‘सचिन पाजी फक्त हसले. त्यांनी आपला पाय सोडवून घेतला आणि मला छातीशी कवटाळत म्हणाले, तुझी जागा पायाशी नाही तर ह्रदयात आहे.’ भारतीय ड्रेसिंग रुमने कायमच आपलं स्वागत केलं असं विराट (Virat Kohli) म्हणाला. दुर्दैवाने या प्रसंगानंतर मुंबईतच दहशतवादी हल्ला झाला आणि इंग्लंडचा तो दौरा अर्धवट राहिला. इंग्लिश संघही तेव्हा हल्ला झालेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये होता. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आणि संघ मायेदेशी परतला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community