Virat Kohli Returns From SA : घरगुती कारणामुळे विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघारी

घरगुती अडचणींमुळे विराट कोहली आफ्रिकेतून भारतात परतला असला तरी पहिल्या कसोटीपूर्वी तो संघात पुन्हा दाखल होणार आहे.

263
Jersey Signed by Virat Kohli : विराट कोहलीची स्वाक्षरी असलेल्या जर्सीला आली ‘इतकी’ किंमत
  • ऋजुता लुकतुके

घरगुती अडचणींमुळे विराट कोहली आफ्रिकेतून भारतात परतला असला तरी पहिल्या कसोटीपूर्वी तो संघात पुन्हा दाखल होणार आहे. (Virat Kohli Returns From SA)

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली काही घरगुती कारणांमुळे मायदेशी परतला आहे. पण, पहिल्या कसोटीपूर्वी तो परत संघात दाखल होणार आहे. तर करंगळीला मार बसलेला ऋतुराज गायकवाड कसोटी मालिकेला मुकणार आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं या बातम्या दिल्या आहेत. (Virat Kohli Returns From SA)

विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत खेळले नव्हते. पण, कसोटीसाठी ते नुकतेच दक्षिण आफ्रिकेत पोहोचले होते. पण, अचानक काही घरगुती कारणांमुळे १-२ दिवसांसाठी कोहली भारतात परतला आहे. (Virat Kohli Returns From SA)

(हेही वाचा – Deep Cleaning : झोपडपट्टी भागांमध्ये ‘या’ कारणांसाठी राबवली जाणार विशेष स्वच्छता मोहिम)

‘विराट घरी उद्भवलेल्या समस्येमुळे मायदेशी परतला आहे. पण, २६ डिसेंबरला पहिली कसोटी सुरू होण्यापूर्वी तो परत येईल,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. इतकंच नाही तर सलामीवीर ऋतुराज गायकवाडला दुसरा एकदिवसीय सामना खेळताना करंगळीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो तिसरा एकदिवसीय सामना खेळू शकला नव्हता. तो ही कसोटी मालिकेला मुकणार आहे आणि उपचारांसाठी तो मायदेशी परतला आहे. (Virat Kohli Returns From SA)

‘ऋतुराजच्या करंगळीला झालेली दुखापत बरी व्हायला वेळ लागणार आहे. दुसऱ्या सामन्यात अवघड झेल पकडताना त्याचं बोट दुखावलं होतं. तो ही मायदेशी परतला आहे,’ असं सूत्रांनी पीटीआयला सांगितलं. (Virat Kohli Returns From SA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.