-
ऋजुता लुकतुके
भारतीय क्रिकेटपटूंचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम नेहमीच व्यस्त असतो. त्यामुळेच क्रिकेटपटूंना न मिळणाऱ्या विश्रांतीची आणि त्याचा तंदुरुस्तीवर होणारा दुष्परिणाम यावर सतत चर्चा रंगत असते. विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli, Rohit Sharma) हे दोन ज्येष्ठ क्रिकेटपटू सध्या वयाच्या पचतीशीत आहेत. आणखी किती काळ ते भारतासाठी खेळू शकतील यावर भारतीय संघाचं पुढील नियोजन अवलंबून असणार आहे.
अशावेळी या दोघांवर काम केलेले भारतीय संघाचे माजी फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी त्यांच्या कारकीर्दीविषयी मोठं भाष्य केलं आहे. ‘सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यापेक्षा मोठी या दोघांची कारकीर्द असू शकेल,’ असं बांगर यांना वाटतं. (Virat Kohli, Rohit Sharma)
(हेही वाचा- Dahi Handi उत्सवादरम्यान २३८ गोविंदा जखमी; जखमींमध्ये बालगोविंदांचाही समावेश)
‘सचिन आणि राहुल वयाच्या चाळीशीतही खेळत होते. रोहित शर्माही तिथपर्यंत खेळू शकेल. अलीकडे खेळाडूंना फिजीओ, आहार तज्ज यांची चांगली मदत मिळते. खेळाडूही स्वत:वर काम करतात. अशावेळी रोहित राहुल इतका नक्कीच खेळू शकेल,’ असं बांगर यांनी रोहितविषयी बोलताना सांगितलं. तर विराटविषयी त्यांचा दृष्टिकोण आणखी सकारात्मक आहे. (Virat Kohli, Rohit Sharma)
‘कोहली पारंपरिक खेळाडू आहे. त्याचं कसोटीवर प्रेम आहे. त्यामुळे इतर दोन प्रकार खेळणं बंद केलं तरी कसोटी तो सगळ्यात शेवटी सोडेल. तंदुरुस्तीच्या बाबतीतही तो जागरुक आहे. त्यामुळे विराट किती खेळणार, हे तोच ठरवू शकेल. आणि तो दीर्घ काळ खेळेल. असं होऊ शकतं की, चाळीशी जवळ आल्यावर तो एकदिवसीय क्रिकेट सोडेल,’ असं बांगर यांनी विराटविषयी बोलताना सांगितलं. (Virat Kohli, Rohit Sharma)
(हेही वाचा- नामिबियावरून आणलेल्या Kuno National Parkमधील आणखी एका चित्त्याचा मृत्यू)
संजय बांगर यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये भारतीय क्रिकेटविषयी आपली रोखठोक मतं सांगितली आहे. रवी शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना संजय बांगर दीर्घकाळ फलंदाजीचे प्रशिक्षक होते. त्यांची मदत झाल्याचं विराटने वेळोवेळी बोलून दाखवलं आहे. (Virat Kohli, Rohit Sharma)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community