विराट कोहलीने (Virat Kohli) पाकिस्तानची धुलाई करत आता वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. विराट कोहलीने धडाकेबाज फटकेबाजी केल्यामुळे पाकिस्तानला त्याच्यापुढे लोटांगण घालावे लागले. विराटने यावेळी तुफानी फटकेबाजी करत असा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला की, आतापर्यंत क्रिकेट विश्वात ही गोष्ट कोणालाही करता आली नाही.
ही गोष्ट घडली १३ व्या षटकात. त्यावेळी हारिस रौफ हा गोलंदाजी करत होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीने (Virat Kohli) खणखणीत चौकार मारून आपल्या नावावर मोठा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. विराट कोहलीने पाकिस्तानच्या सामन्यात दमदार फलंदाजी करताना वनडे क्रिकेमधील आपल्या १४ हजार धावा पूर्ण केल्या. विराट कोहली हा जागतिक क्रिकेटमध्ये वनडेत १४ हजार धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांनी आपल्या नावावर १४ हजार धावा केल्या होत्या.
(हेही वाचा Shivaji University च्या नामांतरासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार)
विराट कोहलीने कोणता वर्ल्ड रेकॉर्ड रचला
विराट कोहलीने (Virat Kohli) १४ हजार धावा करताना वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. कारण विराट कोहलीने जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये १४ हजार धावा करण्याचा पराक्रम आपल्या नावावर केला आहे. पण विराटच्या नावावर फक्त एवढचा वर्ल्ड रेकॉर्ड नाही तर विराट कोहलीने ८०००, ९०००, १०,०००, ११,००० १२,०००, १३,००० आणि आता १४, ००० हजार सर्वात जलद करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. जगभरात कोणत्याही क्रिकेटपटूला एवढ्या जलदपणे धावा करता आलेल्या नाहीत. विराट कोहली भन्नाट फॉर्मात आला होता. विराटने या सामन्यात दमदार सुरुवात केली. त्यानंतर विराटने आपले सर्व फटके पोतडीतून बाहेर काढले आणि तो पाकिस्तानच्या गोलंदाजांवर तुटून पडला.
Join Our WhatsApp Community