-
ऋजुता लुकतुके
विराटचं ईडन गार्डन्स मैदानाबरोबर एक खास नातं आहे. आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक त्याने इथंच झळकावलं होतं. त्यानंतर वाढदिवसाच्या दिवशी विक्रमी ४९वं शतक ठोकल्यानंतर तिथल्या ग्राऊंड स्टाफला वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी करून घेतलं. (Virat @35)
क्रिकेटच्या मैदानावर राजासारखा वावरणारा किंग कोहलीचं मैदानाबाहेरचं लीन रुप काल ईडन गार्डन्सवरील ग्राऊंड स्टाफने पाहिलं. आपल्या सहृदयतेनं त्याने प्रेक्षकांचीही मनं जिंकली. (Virat @35)
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर २४३ धावांनी मोठा विजय संपादन केला. यात विजयाचा शिल्पकार १२१ चेंडूत १०१ धावा करणारा विराट कोहलीच होता. त्याच्या या शतकामुळे भारताने ३२५ धावांचा टप्पा ओलांडला आणि मग गोलंदाजांनी आफ्रिकेला ८३ धावांत गुंडाळलं. शिवाय विराटचा ३५ वा वाढदिवस असल्यामुळे हा दिवस खास होता. (Virat @35)
सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीने ईडन गार्डन्स मैदानावरील ग्राऊंड स्टाफचे विशेष आभार मानले आणि त्यांच्याबरोबर फोटो काढून त्याने केकही कापला. (Virat @35)
Kohli acknowledging the groundstaff after his ‘Man of the Match’ performance. One of the most humble personalities to don the Indian Jersey. #KingKohli #CWC2023 pic.twitter.com/fRh2JpAD4J
— Abhishek Kamal (@iamkamal18) November 5, 2023
(हेही वाचा – Air India-Alaska Tie Up : एअर इंडिया आणि अलास्का एअरलाईन्स संयुक्तपणे अमेरिका आणि कॅनडात ३२ ठिकाणी पुरवणार सेवा)
विराटने आपला ३५ वा वाढदिवस या शतकामुळे यादगार केलाच. शिवाय या विश्वचषकात आता १०८ च्या सरासरीने त्याने ५४३ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या शर्यतीत विराट आता दुसऱ्या स्थानावर आहे. तर विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सचिन आणि पाँटिंग पाठोपाठ तो तिसऱ्या स्थानावर आहे. (Virat @35)
‘भारतासाठी खेळण्याची संधी मिळणं हाच मी माझा बहुमान समजतो. तुम्ही लहानपणी पाहिलेली स्वप्न असतात. त्यातलंच हे एक आहे,’ असं तो शतकानंतर मीडियाशी बोलताना म्हणाला होता आणि या शतकासाठी तसंच सरावादरम्यान उपलब्ध केलेल्या सुविधांसाठी त्याने ग्राऊंड स्टाफचे आभार मानले. (Virat @35)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community