Virat Kohli : विराट कोहली टाकणार राहुल द्रविडला मागे?

Virat Kohli : विराट कोहलीच्या कारकीर्दीसाठी बोर्डर-गावस्कर चषक मालिका महत्त्वाची आहे.

48
Virat Kohli : विराट कोहली टाकणार राहुल द्रविडला मागे?
  • ऋजुता लुकतुके

आगामी बोर्डर-गावस्कर मालिकेत विराट कोहलीला (Virat Kohli) एका आकडेवारीत माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला मागे टाकण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट कोहली नेहमीच चांगली कामगिरी करतो. आतापर्यंत त्याने या तगड्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात २,०४२ धावा केल्या आहेत. आणखी १०२ धावांसह तो राहुल द्रविडच्या सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी त्याच्याकडे आहे. राहुलने ३२ कसोटींत ऑस्ट्रेलियाविरुद्ध २,१४३ धावा केल्या आहेत.

(हेही वाचा – हिंदुत्वाला तडा घालण्याचे काम शरद पवारांनी केले; शेवटच्या सभेत Raj Thackeray बरसले)

विराट (Virat Kohli) ऑस्ट्रेलिया विरुद्ध २५ कसोटी सामने खेळला आहे आणि त्याची सरासरी ४७ धावांच्या वर आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ८ शतकं आणि ५ अर्धशतकं ठोकली आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्याच्या नावावर आहेत ३,६३० धावा. त्या खालोखाल व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने २,४३४ धावा केल्या आहेत. राहुल द्रविडच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या धावा आहेत २१४३ आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या चेतेश्वर पुजाराने २,०७४ धावा केल्या आहेत. विराट कोहली (Virat Kohli) या मालिकेत राहुल द्रविडला मागे टाकू शकतो.

(हेही वाचा – पक्षासोबत गद्दारी केलेला गद्दार तर घरात बसला आहे; शेवटच्या सभेत Raj Thackeray यांनी उद्धव ठाकरेंचं सगळंच काढलं)

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचे अव्वल ५ कसोटी फलंदाज
  • सचिन तेंडुलकर – ३९ कसोटी, ७४ डाव (३,६३० धावा)
  • व्ही. व्ही. एस. लक्ष्मण – २९ कसोटी, ५४ डाव (२,४३४ धावा)
  • राहुल द्रविड – ३२ कसोटी, ६० डाव (२,१४३ धावा)
  • चेतेश्वर पुजारा – २५ कसोटी, ५० डाव (२,०७४ धावा)
  • विराट कोहली – २५ कसोटी, ४४ डाव (२,०४२)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.