Virat Kohli : विराट, रिषभ दिल्लीसाठी रणजी खेळणार का?

Virat Kohli : दिल्ली संघटनेनं या हंगामासाठीच्या संभाव्य संघात या दोघांची नावं टाकली आहेत. 

40
Virat Kohli : विराट, रिषभ दिल्लीसाठी रणजी खेळणार का?
  • ऋजुता लुकतुके

भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम सुरू झालाय. त्यातही आता वेळ झालीय ती रणजी करंडकाची. दिल्ली क्रिकेट संघटनेनं या हंगामासाठी आपल्या संभाव्य ८४ जणांच्या कसोटी संघाची निवड जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यात स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि पुनरागमन करणारा रिषभ पंत यांची नावं आहेत. त्यामुळे हे दोघे यंदा रणजी करंडक खरंच खेळणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. या संभाव्य संघात भारतीय संघातून निवड होऊ शकते असे आणखी दोन खेळाडू आहेत. एक म्हणजे हर्षित राणा आणि दुसरा देशातील सगळ्यात वेगवान गोलंदाज मयांक यादव. ईशांत शर्माचं नाव मात्र या यादीत नाही.

कोव्हिडच्या साथीपूर्वी २०१९ मध्ये पंत शेवटचा दिल्लीसाठी रणजी सामना खेळला होता. तर विराट कोहलीचा (Virat Kohli)  शेवटचा रणजी सामना होता तो दिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेश हा गाझियाबादमध्ये झालेला सामना. हा सामना २०१२ चा आहे. म्हणजेच मागची १२ वर्षं तो दिल्लीसाठी खेळलेला नाही. पण, तो आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात व्यस्त आहे.

(हेही वाचा – BMC : विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास आयुक्तांची मंजुरी, पण महिना उलटला तरी परिपत्रक निघेना !)

विराट व रिषभ यांचा या संघात समावेश करणं ही फक्त औपचारिकता असल्याचं दिल्ली संघटनेतील सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. ‘हे स्टार खेळाडू आमच्या संघटनेशी नोंदणी झालेले खेळाडू आहेत. तेव्हा त्यांचा संभाव्य संघात समावेश असणं ही औपचारिकता आहे. म्हणजे ते रणजी हंगाम खेळतीलच असं नाही. भारतीय संघाचा व्यस्त कार्यक्रम पाहता तशी शक्यताही दिसत नाही,’ असं या सूत्रांनी पीटीआयला सांगितलं.

भारतीय संघ डिसेंबर महिन्यापर्यंत एकूण ९ कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी सुरुवातीला चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होणार आहे. या सगळ्यात भारतीय खेळाडू व्यस्त असतील. बाकी दिल्लीच्या या खेळाडूंच्या यादीत सगळ्यांचं लक्ष असेल ते मयांक यादववर. सातत्याने ताशी १५५ किमी वेगाने त्याने आयपीएलमध्ये गोलंदाजी केली आहे. आणि त्याच्या माऱ्यात अचूकताही आहे. तो दुखापतींपासून दूर राहून सातत्यपूर्ण कामगिरी करू शकतो का आणि भारतीय संघापर्यंत मजल मारतो का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.