Virat Kohli : विराट कोहलीच्या नावावर ‘हा’ नवीन विक्रम 

सेंच्युरियन कसोटीत भारताचा दारुण पराभव झाला असला तरी विराट कोहलीच्या नावावर असा एक विक्रम लागला आहे जो क्रिकेटमध्ये मागच्या १४६ वर्षांत कुणी केलेला नाही 

210
IPL 2024 Virat Kohli : विराट कोहलीला कशाची भीती वाटते?

ऋजुता लुकतुके

विराट कोहलीने (Virat Kohli) एका कॅलेंडर वर्षात दोन हजार आंतरराष्ट्रीय धावा करण्याची कामगिरी तब्बल सातवेळा केली आहे. आणि हा एक नवीन विक्रम आहे. आतापर्यंत अशी कामगिरी कुणीही केलेली नाही. सेंच्युरियन कसोटीत भारतीय संघाचा १ डाव आणि ३२ धावांनी पराभव झाला. ज्या खेळपट्टीवर एकट्या डिन एल्गारने १८५ धावा केल्या, तिथे दुसऱ्या डावात भारताचा अख्खा संघ १३१ धावांत बाद झाला.

कासिगो रबाडा आणि नांद्रे बर्गर यांच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. अपवाद फक्त दोन फलंदाजांचा. पहिल्या डावातला शतकवीर के एल राहुल. आणि पहिल्या डावात ३८ तर दुसऱ्या डावात ७६ धावा करणारा विराट कोहली.

८२ चेंडूंत ७६ धावा करताना विराट कोहलीने २०२३ मध्ये २००७ धावा पूर्ण केल्या. आणि हा एक विक्रम आहे. यापूर्वी २०१२, २०१४, २०१६, २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये विराटने दोन हजारपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. क्रिकेटला अधिकृतपणे सुरुवात झाली ती १८८७ मध्ये. आणि तेव्हापासून आजतागायत अशी कामगिरी कुणी केलेली नाही.

(हेही वाचा-Ind W vs Aus W 1st ODI : भारतीय महिलांवर ऑस्ट्रेलियाची ६ गडी राखून मात )

सेंच्युरियन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं आपल्या आधीच्या धावसंख्येत १५३ धावांची भर घातली. आणि सर्वबाद ४०८ धावा केल्या. त्यानंतर अख्खा भारतीय संघ १३१ धावांतच गारद झाला. रोहीत शर्माला दक्षिण आफ्रिकेत रबाडाने वारंवार सतावलं आहे. आताही त्याने रोहीतचा त्रिफळा उडवला तेव्हा रोहीतने भोपळाही फोडला नव्हता. ११ डावांत ७ वेळा रबाडाने रोहीतला स्वस्तात बाद केलं आहे.

त्यानंतर यशस्वी जयसवाललाही चेंडू सोडताना ग्लव्ह्ज लांब ठेवता आले नाहीत. चेंडू यष्टीरक्षकाकडे जाताना ग्लव्हची कड घेऊन गेला. शुभमन गिलने चांगल्या सुरुवातीनंतर २२ वर विकेट फेकली. तर श्रेयस आणि राहुलही दुसऱ्या डावात फारशी कमाल करू शकले नाहीत.

१३१ या संघाच्या धावसंख्येपैकी एकट्या विराटने ७६ धावा केल्या.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.