भारत विरुद्ध श्रीलंका या टी-२० मालिकेला ३ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. पण या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्पुरती विश्रांती घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
( हेही वाचा : MPSC Recruitment : आरोग्य विभागात मेगाभरती! जाणून घ्या कोणत्या पदांसाठी किती जागा?)
विराट कोहली IPL 2023 पूर्वी भारतासाठी टी२० मालिका खेळणार नाही त्याने टी२० मालिकांमधून तात्पुरती विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. विराटच्या ब्रेकबाबत BCCI च्या अधिकाऱ्यांनी इनसाइड स्पोर्ट्सला माहिती दिली आहे. वनडे मालिकेतून तो संघात पुनरागमन करणार आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
श्रीलंकेचा संघ आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात टी२० मालिकेने करणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ३ जानेवारीला मुंबईत, दुसरा सामना ५ जानेवारीला पुण्यात तर अंतिम तिसरा सामना ७ जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.
टी२० मालिका
- ३ जानेवारी – मुंबई
- ५ जानेवारी – पुणे
- ७ जानेवारी – राजकोट
वन-डे सामने
- १० जानेवारी – गुवाहाटी
- १२ जानेवारी – कोलकाता
- १५ जानेवारी – तिरुअनंतपुरम