कर्णधारपद सोडल्यानंतर सुद्धा भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आजही तेवढाच प्रसिद्ध आहे. जगभरात त्याचा सर्वात मोठा चाहता वर्ग आहे. भारतात सर्वाधिक इन्स्टाग्राम फॉलोवर्स सुद्धा विराट कोहलीला लाभले आहेत. आता विराटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सर्वाधिक ब्रॅण्ड मूल्य असलेल्या देशातील टॉप ५ सेलिब्रिटींच्या यादीत क्रिकेटर विराट कोहलीने सलग पाचव्यांदा आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
( हेही वाचा : आता विद्युत वेगाने धावणार कोकण रेल्वे! )
सलग पाचव्यांदा विराट कोहलीने मारली बाजी
कोहलीचे ब्रॅण्ड मूल्य १८५.७ मिलियन डॉलर इतके आहे. २०२० वर्षाच्या तुलनेत कोहलीच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूत घट झाली आहे. २०२० मध्ये विराट कोहलीची व्हॅल्यू २३७७ मिलियन डॉलर होती. विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर अभिनेता रणवीर सिंग आहे, ज्याची ब्रँड व्हॅल्यू १५८.३ मिलियन डॉलर एवढी आहे. मंगळवारी सेलिब्रिटी ब्रँड लिस्टिंग फर्म डफ अँड फेल्प्सने हा अहवाल जारी केला. यात सलग पाचव्यांदा विराट कोहलीने बाजी मारली आहे.
महिलांमध्ये आलिया अव्वल
अक्षय कुमार या यादीत १३६.९ मिलियन डॉलर व्हॅल्यूसह तिसऱ्या स्थानी आहे. या यादीत चौथ्या स्थानावर अभिनेत्री आलिया भट्ट आहे, तिची ब्रँड व्हॅल्यू ६८१ मिलियन डॉलर आहे. महिला सेलिब्रिटींमध्ये आलिया भट आघाडीवर आहे. तर दीपिका पदुकोण या यादीत सातव्या स्थानी आहे.
सेलिब्रिटी ब्रँड लिस्टिंग फर्म डफ अँड फेल्प्सचे व्यवस्थापकीय संचालक अविरल जैन म्हणाले की, या यादीमध्ये चित्रपट उद्योगातील व्यक्तींचा दबदबा आहे. परंतु विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि पीव्ही सिंधू यांसारख्या खेळाडूंनीही या यादीत आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे.
Join Our WhatsApp Community