ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात नाबाद १०३ धावा केल्या. आणि त्याचवेळी त्याच्या विशाल कारकीर्दीतही २६,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा त्याने ओलांडला. बांगलादेश विरुद्धचा सामना सुरू झाला तेव्हा त्याला यासाठी फक्त ७७ धावांची गरज होती.
हा महत्त्वाचा टप्पा पार करतानाच त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला. कारण, विराटने हा विक्रम ५१० सामन्यांमध्ये केला आहे. सर्वात जलद २६,००० धावा करणारा फलंदाज आता विराट (Virat Kohli) आहे. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ८५, अफगाणिस्तान विरुद्ध नाबाद ५५ आणि आता बांगलादेश विरुद्ध नाबाद १०३ धावा केल्या आहेत.
Another run-chase
Another fifty
Another milestoneKing Kohli reaches 𝟮𝟲,𝟬𝟬𝟬 𝗶𝗻𝘁𝗲𝗿𝗻𝗮𝘁𝗶𝗼𝗻𝗮𝗹 𝗿𝘂𝗻𝘀! 👑#CWC23 | #TeamIndia | #INDvBAN | #MenInBlue pic.twitter.com/DMkjgc88WT
— BCCI (@BCCI) October 19, 2023
२६,००० आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम हा क्रिकेटमधील मोठा मापदंड आहे. विराटच्या आधी फक्त तीन फलंदाजांनी हा टप्पा ओलांडला आहे. श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर २८,१०३ धावा जमा आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग २७,४८३ धावांसह विराटच्या वर आहे.
सचिन तेंडुलकर सगळ्यात वर आहे. आणि त्याच्या नावावर आहेत ३४,३५७ धावा. सचिन तेंडुलकरने ही कामगिरी ६६४ सामन्यांमध्ये केली आहे. विराट आता जितका तंदुरुस्त आहे ते पाहता तो ४० व्या वर्षीपर्यंत खेळू शकेल असा अंदाज आहे. त्यामुळे विराटचं सातत्य टिकलं तर विराट या विक्रमालाही गवसणी घालू शकेल.
शतकांच्या बाबतीत विराटच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४८ शतकं जमा आहेत. इथं एकटा सचिन तेंडुलकर त्याच्या वर आहे. सचिनने ४९ शतकं केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये मात्र सचिन विराटच्या खूप पुढे आहे. सचिनच्या नावावर ५१ शतकं आहेत. विराटच्या नावावर २७.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community