Virat Kohli : सुनील गावस्करांच्या सल्ल्यावर विराटच्या प्रशिक्षकांनी काय दिलं उत्तर?

Virat Kohli : गावस्कर यांनी विराटला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका टाळण्याचा सल्ला दिला होता.

38
Virat Kohli : सुनील गावस्करांच्या सल्ल्यावर विराटच्या प्रशिक्षकांनी काय दिलं उत्तर?
  • ऋजुता लुकतुके

खराब फॉर्मशी झगडणाऱ्या विराट कोहलीला (Virat Kohli) अलीकडेच सुनील गावस्कर यांनी सचिन तेंडुलकरचं अनुकरण करण्याचा सल्ला दिला होता. सचिन स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मारण्याच्या नादात सतत बाद होत होता, तेव्हा त्याने सिडनीत मनावर संयम ठेवत २४१ धावांच्या अख्ख्या खेळीत एकही स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मारला नव्हता. ‘तोच संयम विराटनेही दाखवावा आणि ज्या फटक्यावर तो सातत्याने बाद होतोय, तो खेळणंच टाळावं,’ असं सुनील गावस्कर यांनी अलीकडे स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर बोलताना म्हटलं होतं.

यावर विराटचे (Virat Kohli) लहानपणापासूनचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी सुनील गावस्कर यांना उत्तर दिलं आहे. ‘सुनील गावस्कर महान खेळाडू आहेत आणि त्यांचा सल्ला स्वागतार्ह आहे. पण, विराटवर बोलतात तसं त्यांनी इतर फलंदाजांवरही बोलावं, असं शर्मा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे. शर्मा यांनी विराट आठ वर्षांचा असल्यापासून त्याला प्रशिक्षण दिलं आहे. ते स्वत: दिल्ली संघाकडून खेळलेले आहेत आणि ते फिरकीपटू होते.

(हेही वाचा – Ashwin Retires : अश्विनच्या अचानक निवृत्तीमागे गौतम गंभीरचा हात किती?)

खरंतर या मालिकेत सुनील गावस्कर यांनी एकट्या विराटवर (Virat Kohli) नाही तर सगळ्याच भारतीय फलंदाजांवर टीकाही केली आहे आणि त्यांना सल्लाही दिला आहे. अलीकडेच त्यांनी शुभमन गिलला, ‘तुझे आवडते फटके खिशात घालून ठेव. आम्हाला दाखवू नकोस,’ या भाषेत ताशेरे ओढले होते.

राजकुमार शर्मा यांनी मात्र सुनील गावस्करांनी दिलेला सल्ला सकारात्मक घेतलेला दिसत नाही. ‘विराट २००८ पासून खेळतोय आणि चांगलं खेळत नसता तर इतकी वर्षं टिकून राहिला नसता. आताही त्याने पर्थमध्ये शतक झळकावलं आहे,’ अशी टिप्पणी शर्मा यांनी केली आहे. शर्मा यांचं म्हणणं काहीही असलं तरी विराटचा (Virat Kohli) कसोटीतील फॉर्म या संबंध वर्षात काळजी करण्यासारखा आहे. पहिल्या डावांत त्याची सरासरी आहे अवघी ९ धावांची. तो वर्षभरात ८ कसोटी खेळला आहे आणि त्याच्या धावा आहेत – ६, ४७, ०, १, ४, ५, ७ आणि ३.

(हेही वाचा – मुंबईवर कर्नाटकचा हक्क; काँग्रेस आमदार Laxman Savadi यांनी उधळली मुक्ताफळे)

‘मला विराटची (Virat Kohli) आकडेवारी माहीत नाही. पण, तो चांगला खेळाडू आहे आणि तो नक्की पुनरागमन करेल. त्याला कुणी काहीही सांगण्याची गरज नाही. कारण, त्याच्या इतकं सातत्य कुणीही आतापर्यंत दाखवलेलं नाही. त्याच्या तंत्राची काळजी करण्याचीही गरज नाही. कारण, तो प्रगल्भ आहे,’ असं शर्मा यावर बोलताना म्हणाले. विराटबरोबर आताही ते चर्चा करत असतात. पण, ती उघड करणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.