-
ऋजुता लुकतुके
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट खेळणं अनिवार्य केल्यानंतर स्टार फलंदाज विराट कोहलीने दिल्ली रणजी संघाला आपली उपलब्धता तर कळवली. पण, इतक्यातच त्याची मान दुखावल्याचं समोर आलं आहे. त्याला वेदनाशामक इंजेक्शन घ्यावी लागत असल्याचं समजतंय. त्यामुळे दिल्ली रणजी संघात नाव असूनही तो २३ तारखेला खेळेल की नाही हे अजून गुलदस्त्यात आहे. (Virat Kohli)
दरम्यान, रिषभ पंत हा सामना खेळणार आहे. आणि त्याने आपल्या समावेशामुळे जमून आलेला संघ बदलू नका, असं म्हणत आयुष बदोनीच्या नेतृत्वाखाली खेळायला मान्यता दिली आहे. दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी ही माहिती दिली आहे. ‘रिषभ आणि माझं शुक्रवारीच बोलणं झालं. आणि यात एखाद्या सामन्यासाठी संघाचा कर्णधार बदलू नका, अशी विनंती मला केली आहे. आयुष संघातील खेळाडूंना ओळखतो. आणि त्याचे काही ठोकताळे त्याने आतापर्यंत यशस्वी केले असतील. तेव्हा जमलेलं समीकरण बदलू नका, असं रिषभ पंतचं म्हणणं होतं,’ असं जेटली यांनी स्पष्ट केलं आहे. (Virat Kohli)
🚨 VIRAT KOHLI GEARING UP. 🚨
– Kohli had a neck sprain, and took an injection. However it is possible he’ll train with the Delhi Ranji squad in Rajkot on 21st-22nd Jan. (Sahil Malhotra/TOI). pic.twitter.com/z31ANejUmG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 17, 2025
दरम्यान, विराट कोहलीने आपल्या सहभागाविषयी दिल्ली असोसिएशनला कळवलं आहे. आणि तो २३ तारखेच्या सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात खेळणारही आहे. पण, सध्या त्याची मान दुखावली आहे. आणि त्यावर त्याने इंजेक्शन घेतलं आहे. त्यामुळे तो हा सामना खेळणार की नाही याविषयी साशंकता आहे. पण, २१ आणि २२ ला राजकोट इथं होणाऱ्या सरावात तो सहभागी होऊ शकतो. दिल्ली संघाला येणाऱ्या दिवसांत २३ तारखेला सौराष्ट्र आणि ३० तारखेला रेल्वे विरुद्ध सामना खेळायचा आहे. आणि अशीही शक्यता आहे की, विराट सौराष्ट्र विरुद्ध खेळणार नाही. पण, तो रेल्वे विरुद्ध खेळेल. पण, तो संघाबरोबर सराव नक्की करणार आहे. (Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community