- ऋजुता लुकतुके
भारतीय संघासमोर आता कसोटी आहे ती ऑस्ट्रेलियाची. ऑस्ट्रेलियाचा दौरा कुठल्याही संघासाठी खडतरच असतो. यावेळी न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला निघाला आहे. भारतीय संघ दोन टप्प्यांमध्ये पर्थला जाणार आहे. खेळाडूंचा एक संच रविवारी पहाटेच ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. मुंबई विमानतळावर स्टार फलंदाज कोहली (Virat Kohli) चाहत्यांना दिसला. यावेळी त्याचे कुटुंबीयही त्याच्याबरोबर होते.
विराटला (Virat Kohli) चाहत्यांनी सेल्फीचा आग्रह धरला. सुरुवातीला विराटने थोडे आढेवेढे घेतले. ‘कुटुंबीयांना थांबवून तुमच्याबरोबर थोडीच सेल्फी घेणार आहे मी,’ असं म्हणत विराटने चाहत्यांना रोखलं. पण, नंतर तो सेल्फीसाठी तयार झाला आणि तरुणांना त्याने निराश केलं नाही.
(हेही वाचा – Rohit Sharma : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना; रोहित शर्मा संघाबरोबर नाही )
Virat Kohli snapped with fans at Mumbai Airport
– He is travelling with his family! ❤️ pic.twitter.com/Miae4tnNNZ
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) November 9, 2024
हा दौरा भारतीय संघासाठी जसा महत्त्वाचा आहे तसाच विराट कोहलीसाठीही (Virat Kohli). कारण, या वर्षात तो बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळला आहे आणि यात त्याला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. त्याच्या नावावर या कॅलेंडर वर्षात एकही शतक नाही. न्यूझीलंड विरुद्ध बंगळुरू कसोटीत केलेल्या ७० धावा ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या आहे. बाकी ६ डावांत मिळून त्याला शंभर धावाही करता आलेल्या नाहीत.
आतापर्यंत ऑस्ट्रेलियात आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराटची (Virat Kohli) कामगिरी दमदार आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकल्या आहेत. ६० पेक्षा जास्तच्या सरासरीने त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध १,३०० धावा केल्या आहेत. त्यामुळे या दौऱ्यात विराट कोहलीला पुन्हा एकदा फॉर्म गवसावा अशीच चाहत्यांची इच्छा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community