Virat Kohli : विराट कोहली सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमापासून एक पाऊल दूर

ॲडलेड कसोटीत विराटकडून नवीन विक्रम साजरा होऊ शकतो.

56
Virat Kohli : विराट कोहली सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमापासून एक पाऊल दूर
Virat Kohli : विराट कोहली सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमापासून एक पाऊल दूर
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहलीने (Virat Kohli) पर्थमधील शतकाने फक्त त्याचा गेल्या काही कसोटींमधला शतकांचा दुष्काळ संपवला नाही तर क्रिकेटमध्ये नवीन विक्रमांना गवसणी घातली आहे. ऑस्ट्रेलियातील त्याचं हे दहावं आंतरराष्ट्रीय शतक होतं. आणि या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) मागे टाकलं. परदेशी भूमीत १० आंतरराष्ट्रीय शतकं ठोकणारा विराट आता एकमेव खेळाडू आहे. त्याचबरोबर उर्विरत मालिकेत विराटने (Virat Kohli) आणखी एक दरी शतक ठोकलं तरी तो थेट सर डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे. ब्रॅडमन यांच्या नावावर गेली ७६ वर्षं एक विक्रम आहे. विराट त्यांचा भागिदार होऊ शकेल.

सर ब्रॅडमन (Don Bradman) यांनी १९३० ते १९४८ या कालावधीत इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये ११ आंतरराष्ट्रीय कसोटी शतकं ठोकली. आणि अशी कामगिरी करणारे सध्या ते एकमेव क्रिकेटपटू आहेत. विराटने मालिकेत अकरावं शतक झळकावलं तर अर्थात, तो ब्रॅडमन यांची बरोबरी करेल. म्हणजे परदेशात एकाच भूमीवर ११ शतकं झळकावणारा सध्याच्या क्रिकेटपटूंपैकी विराट (Virat Kohli) एकटाच असेल.

(हेही वाचा – Navi Mumbai Crime : हैद्राबाद येथून आलेला कोट्यवधींचा ड्रग्स नवी मुंबईतुन जप्त, डीआयआरची कारवाई)

ब्रॅडमन (Don Bradman) यांनी १९ कसोटींमध्ये ३० डावांत ही कामगिरी केली होती. आणि त्यांची सरासरी तब्बल १०२ धावांची होती. ११ शतकं आणि ३ अर्धशतकं त्यांनी ठोकली. तर त्यांची सर्वोत्तम धावसंख्या ३३४ ही इंग्लंडमध्ये केलेलीच आहे. तर विराट कोहलीने (Virat Kohli) ऑस्ट्रेलियात खेळलेल्या ४० सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. २०११ पासून ऑस्ट्रेलियात विराटची कामगिरी नेहमीच अव्वल राहिली आहे. विराटच्या खालोखाल जॅक हॉब्ज (ऑस्ट्रेलियात ९ शतकं) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) (श्रीलंकेत ९ शतकं) यांचा नंबर लागतो. सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी वेस्ट इंडिजमध्ये ७ शतकं ठोकली आहेत. तर विवियन रिचर्ड्स यांनीही इंग्लंडमध्ये ७ शतकं केली आहेत.

विराटची ऑस्ट्रेलियातील कामगिरी पाहूया,

WhatsApp Image 2024 12 04 at 11.10.14 AM

ऑस्ट्रेलियातील विराटची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे ती मेलबर्न कसोटीत २०१४ मध्ये त्याने केलेली १६९ धावांची खेळी. ऑस्ट्रेलियात तीनही प्रकारात मिळून विराटने २,७१० धावा केल्या आहेत. आणि त्याची सरासरीही ५४.२० अशी तगडी आहे. भारतीय संघ बोर्डर गावसकर चषकातील आपला दुसरा कसोटी सामना ॲडलेडमध्ये खेळणार आहे. हा सामना दिवस – रात्र चालणारा असेल. पहिल्या पर्थ कसोटीत भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवला होता. दुसऱ्या डावांत नाबाद १०० धावा करून कोहलीने या विजयात मोठा वाटा उचलला. येत्या ६ डिसेंबरला ॲडलेड कसोटी सुरू होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.