-
ऋजुता लुकतुके
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर गेले दोन दिवस संघाचा सराव बघण्यासाठीही गर्दी होती. कारण, स्टार खेळाडू विराट कोहली संघाबरोबर सराव करत आहे. ३० तारखेपासून (गुरुवार) सुरू होणाऱ्या रेल्वे विरुद्धच्या सामन्यात विराट दिल्लीकडून खेळणार आहे. आणि त्याला पाहायला जेटली मैदानावर गर्दी दिसून येत आहे. विराटने बुधवारीही दोन्ही सत्रात सराव केला. दिल्ली क्रिकेट असोसिएशनचा लोगो असलेला टी-शर्ट आणि स्वेटर घालून विराट मैदानात उतरला. आणि त्याने खेळाडूंना, ‘का थांबलाय, सुरू करा रे,’ असं दिल्लीच्या स्वरात सुनावलं आणि खेळाडूंचा फुटबॉलचा सराव सुरू झाला. (Virat Kohli)
(हेही वाचा- मुंबईत लवकरच वॉटर टॅक्सी, वॉटर मेट्रो धावणार ? Transport Minister Pratap Sarnaik काय म्हणाले ?)
विराट मैदानावर येताच संघाचे प्रशिक्षक महेश भाटी यांनी दोन युवा खेळाडूंना विराटकडून त्याचं किट घेण्याची खूण केली. यावर विराटने नम्रतेनं ही मदत नाकारली. ‘भैय्या, माझं सामान आहे हे. मीच नको का वाहायला?’ असं विचारत विराटने सराव सुरू केला. महेश भाटी यांनी विराटला १७ व १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये मार्गदर्शन केलं आहे. (Virat Kohli)
UPDATE: VIRAT CAME 1 HOUR BEFORE REPORTING TIME OF 9AM.
8 AM he was at the gym, reveals Delhi coach Sarandeep Singh to me. Followed by catching, batting for nearly an hour, pep talk to team & again going for a run. “See this dedication & learn” Coach told his boys. #ViratKohli pic.twitter.com/2yuFXDf90n— Sumit Ghosh (@SumitG71) January 29, 2025
सरावासाठी ९ वाजताची वेळ दिली असताना विराट मैदानावर ८ वाजता हजर होता. पहिलं सत्र व्यायामांचं होतं. पण, विराट फिजीओच्याही आधी आपले व्यायाम करताना दिसला. आणि प्रशिक्षक महेश भाटींशीही त्याच्या गप्पा चालू होत्या. दिल्लीच्या मैदानांवर पूर्वी खूप सारं गवत आणि मध्ये खेळपट्टी ऐवजी मॅट असायचं याची आठवण दोघांनी काढली. आणि दिल्लीचे इतर खेळाडू आल्यावर भाटी यांनी त्यांच्यासमोर विराटचं उदाहरण ठेवलं. ‘विराट लहानपणापासून असाच होता. तो सरावासाठी कायम पहिला पोहोचायचा. आणि सगळ्यात शेवटी घरी जायचा. आता थांब असं त्याला सांगायला लागायचं. आताही तो तसाच आहे. भूक जितकी मोठी तितकी प्रगती होते, याचं उदाहरण म्हणजे विराट आहे,’ असं भाटी इतरांना म्हणाले. (Virat Kohli)
२०१२ नंतर विराट पहिल्यांदा दिल्लीकडून रणजी सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतर बीसीसीआय आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणं सक्तीचं केलं आहे. त्यानुसार रोहित, रिषभ, यशस्वी, शुभमन आणि जडेजा आपापल्या रणजी संघाकडून गेल्या आठवड्यात खेळले आहेत. विराटने मानेच्या दुखापतीमुळे आधीच्या सामन्यातून माघार घेतली होती. पण, रेल्वेविरुद्धचा सामना तो खेळणार आहे. के. एल. राहुलही कर्नाटककडून खेळताना दिसेल. (Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community