-
ऋजुता लुकतुके
विराट कोहली तब्बल १३ वर्षांनंतर आपला पहिला रणजी सामना खेळण्यासाठी सिद्ध झाला आहे. आणि त्यासाठी तो मुंबईत माजी फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांच्याबरोबर सराव करत आहे. २०१४ ते २०१९ या काळात संजय बांगर भारतीय संघाबरोबर होता. आणि हा कालावधी विराट कोहलीचा सर्वोत्तम काळ होता. तेव्हाही आपल्या कामगिरीचं श्रेय विराटने अनेक मुलाखतींमधून बांगरला दिलं होतं. त्यामुळे खराब फॉर्मशी झगडत असतानाही विराटला संजय बांगरची मदत घ्यावीशी वाटली. वांद्रे इथं नेट्समध्ये दोघांनी एकत्र सराव सुरू केला आहे. (Virat Kohli)
(हेही वाचा- Vikram Misri : परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी चीन दौऱ्यावर ; या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार)
यापूर्वीही अनेकदा मुंबईत असताना विराटने संजय बांगरची मदत घेतली आहे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ८० शतकं ठोकली आहेत. आणि त्यातील ६० च्या वर शतकं त्याने बांगर भारतीय संघाबरोबर असताना केलेली आहेत. बांगर पाठोपाठ विक्रम राठोड भारताचा फलंदाजीचा प्रशिक्षक झाला. पण, या कालावधीत संजय बांगर विराटची आयपीएल फ्रँचाईजी बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सबरोबर होता. त्यामुळे दोघांचं नातं चांगलं राहिलं. गेल्यावर्षी आयपीएलमध्येही विराट कोहली सर्वाधिक धावांसाठी ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता. (Virat Kohli)
Virat Kohli working with Sanjay Banger in Mumbai. 🙇♂️ pic.twitter.com/T4zEhC2D2f
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 25, 2025
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओत बांगर विराटला १६ यार्डांवरून चेंडू फेकताना दिसतो. आणि विराट आपल्या बॅकफूटवर काम करताना यात दिसतो. बीसीसीआयने अलीकडेच राष्ट्रीय खेळाडूंनाही रणजी खेळणं अनिवार्य केल्यानंतर विराटसह सर्व स्टार खेळाडू आपापल्या राज्य संघाकडून रणजी खेळत आहेत. तर विराटने मान दुखावल्यामुळे सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली. पण, तो ३० जानेवारीला रेल्वेविरुद्घचा सामना खेळणार आहे. (Virat Kohli)
(हेही वाचा- मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार; Coastal Road एका तासाचे अंतर फक्त १५ मिनिटांत पार होणार!)
विराट कोहली सध्या फॉर्मशी झगडतोय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने ५ कसोटींमध्ये फक्त १९० धावा केल्या. उजव्या यष्टीवर आणि यष्टीबाहेर फेकलेल्या चेंडूवर तो सातत्याने बाद होतोय. खेळातील ही तांत्रिक चूक सुधारण्यावर सध्या तो भर देत आहे. रणजी सामन्यानंतर विराट आपल्याला इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसेल. (Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community