-
ऋजुता लुकतुके
न्यूझीलंड विरुद्धची मालिका १६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. आणि या मालिकेपूर्वी विराट कोहलीचं (Virat Kohli) मुंबई विमानतळावर दर्शन झालं. विराट दिसल्यावर त्याच्या भोवती लगेच पत्रकार जमले. यापैकी एका छायाचित्रकारने विराटला गोंधळात पाडणारा प्रश्न विचारला. ‘विराट, बीजीटीमें आग लगानी है,’ असं हा छायाचित्रकार विराटला म्हणला. त्यावर विराटने गोंधळून, ‘कहा आग लगानी है,’ असं विचारलं. त्यावर पत्रकाराने फोड करून सांगितलं, ‘बोर्डर – गावसकर ट्रॉफी.’ विराटच्या चेहऱ्यावर स्मित अवतरलं. आणि त्याने लगेच होकार दिला.
कोहली या वर्षीच्या सुरुवातीला झालेली इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका खेळू शकला नव्हता. आपला मुलगा अकायच्या जन्मासाठी तो लंडनमध्ये होता. आता आगामी तीन महिन्यात विराट न्यूझीलंड विरुद्धच्या ३ कसोटी आणि ऑस्ट्रेलियात जाऊन ५ कसोटी खेळणार आहे. त्यापूर्वी विराटचा हा छोटा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
(हेही वाचा – Dussehra 2024: दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पान समजून, ग्राहकांनी बाजारात कांचनची पाने लुटली)
Fan : Virat bhai BGT mai Aag lagani hai 🔥
Virat : Kiske sath 😂 pic.twitter.com/d7iP5aUkte— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) October 11, 2024
न्यूझीलंडच्या मालिकेनंतर भारत बहुचर्चित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निघणार आहे. २२ नोव्हेंबरला ही मालिका सुरू होणार आहे. २०१४ पासून भारतीय संघाने बोर्डर – गावसकर चषक आपल्याकडे राखला आहे. आणि यात विराट कोहलीचं योगदान खेळाडू आणि कर्णधार म्हणूनही मोठं आहे. कारण, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात दोन मालिका जिंकल्या आहेत. आताही बोर्डर – गावसकर मालिकेची चर्चा क्रिकेट विश्वात आधीपासून सुरू झाली आहे.
या मालिकेनंतर आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपदासाठीच्या अंतिम फेरीचं चित्रही स्पष्ट होईल. २२ नोव्हेंबरची पहिली कसोटी पर्थला होणार आहे. तर दुसरी कसोटी ६ डिसेंबरपासून ॲडलेडला होणार आहे. ही कसोटी दिवस – रात्र खेळवण्यात येईल. १४ डिसेंबरपासून तिसरी कसोटी ब्रिस्बेन इथं होणार आहे. तर चौथी कसोटी मेलबर्नला होणारी बॉक्सिंग डे कसोटी असेल. पाचवी कसोटी ३ जानेवारीपासून सिडनीला होणार आहे. विराटने बोर्डर – गावसकर चषकात २५ सामन्यांत ४७ च्या सरासरीने २०२५ धावा केल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community