Virat Kohli : विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू बॉलिवूड स्टारपेक्षाही जास्त; रणवीर, शाहरुखला टाकलं मागे 

127
Virat Kohli : विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू बॉलिवूड स्टारपेक्षाही जास्त; रणवीर, शाहरुखला टाकलं मागे 
Virat Kohli : विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू बॉलिवूड स्टारपेक्षाही जास्त; रणवीर, शाहरुखला टाकलं मागे 
  • ऋजुता लुकतुके

भारताचा क्रिकेट स्टार विराट कोहली (Virat Kohli) २०२३ मध्ये देशातील सगळ्यात जास्त ब्रँड व्हॅल्यू असलेला स्टार ठरला आहे. या बाबतीत त्याने रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि शाहरुख खानला (Shah Rukh Khan) मागे टाकलं आहे. गेल्या वर्षभरात कोहलीचं ब्रँड मूल्य २९ टक्क्यांनी वाढून २२७ दशलक्ष अमेरिकन डॉलरवर पोहोचलं आहे. देशातील पहिल्या २० स्टारचं एकत्रित मूल्य १४ टक्क्यांनी वाढलं आहे. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राने याविषयीचा एक अहवाल सादर केला आहे. (Virat Kohli)

(हेही वाचा- राज्य सरकारला मोठा दणका; RTE प्रवेशाबाबतचा अध्यादेश मुंबई हायकोर्टाकडून रद्द)

विराटच्या खालोखाल रणवीर सिंग २०३ दशलक्ष अमेरिकन डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर शाहरुख खान तिसऱ्या आणि अक्षय कुमार चौथ्या स्थानावर आहे. आलिया भट महिलांमध्ये पहिली तर एकूण पाचव्या स्थानावर आहे. (Virat Kohli)

 विराट कोहली सध्या त्याची पत्नी अनुष्का, मुलगी वामिका आणि मुलगा अकायसह लंडनमध्ये आहे. टी-२० विश्वचषकातील विजयानंतर भारतीय संघ बार्बाडोसमध्येच तीन दिवस अडकला होता. भारतात परतल्यावर संघाची विजयी मिरवणूक निघाली, पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर (PM Narendra Modi) संघाची भेट झाली. या तीन दिवसीय कार्यक्रमानंतर विराट तातडीने आपल्या कुटुंबीयांबरोबर लंडनला परतला आहे. त्याच्या मुलाचा जन्म फेब्रुवारी महिन्यात लंडन इथंच झाला. तेव्हापासून पत्नी अनुष्का आणि मुलं तिथेच आहेत. अलीकडेच विराटचा आपल्या कुटुंबाबरोबरचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Virat Kohli)

 यात विराटच्या कडेवर ५ महिन्यांचा अकाय आहे. तर शेजारी अनुष्का आणि मुलगी वामिकाही आहेत. विराट सध्या लंडनमध्ये सुटी घालवत आहे. पण, श्रीलंका दौऱ्यावर तो एकदिवसीय मालिकेत सहभागी होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना २ ऑगस्टला कोलंबो इथं होणार आहे. टी-२० विश्वचषकानंतर विराटने टी-२० मधून निवृत्ती घेतली आहे. (Virat Kohli)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.