Virat Kohli : विराट कोहलीचा पत्नी आणि मुलांसह ऑस्ट्रेलियात डे – आऊट

विराट कोहली पत्नी आणि दोन्ही मुलांसह पर्थमध्ये आला आहे.

84
Virat Kohli : विराट कोहलीचा पत्नी आणि मुलांसह ऑस्ट्रेलियात डे - आऊट
Virat Kohli : विराट कोहलीचा पत्नी आणि मुलांसह ऑस्ट्रेलियात डे - आऊट
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली दिवसभराच्या सरावानंतर आपल्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवताना दिसला. विराट (Virat Kohli) आपला खाजगीपणा जपणारा क्रिकेटपटू आहे. आणि आपल्या मुलीचे फोटो तो सोशल मीडियावर प्रसिद्घ होऊ देत नाही. बुधवारी तो मुलगी वामिका आणि पत्नी अनुष्काबरोबर बाहेर वेळ घालवताना दिसला. पर्थमध्ये कोहली कुटुंबीय एकत्र कॉफी पिताना दिसले.

चाहत्यांनी कोहलीचे कुटुंबाबरोबर फोटोही काढले. त्यांना विराटने थांबवलं नसलं तरी आपल्या मुलीचा चेहरा त्याने जरुर झाकला. विराटच्या फॅनपेजवर लगेचच विराटचे हे फोटो झळकले आहेत.

(हेही वाचा – Maharashtra Vidhansabha Election 2024: महायुतीची सत्ता आल्यास राज्यात MP पॅटर्न राबवणार? Vinod Tawde यांचे सूचक विधान)

 

View this post on Instagram

 

A post shared by virushka stan 2.0 (@virushkaxvamikaa)

रविवारी आपल्या कुटुंबीयांसह विराट पर्थला पोहोचला. आणि लगेचच सोमवारी त्याने सरावाला सुरुवात केली आहे. उर्वरित संघाच्या एक दिवस आधी विराट ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. आणि त्याने बोर्डर गावसकर मालिकेवर आपलं लक्ष सध्या केंद्रीत केलं आहे. सोमवारी आणि बुधवारी त्याने नेट्समध्ये कसून सराव केला. आणि ऑस्ट्रेलियात तो आखूड टप्प्याचे आणि तेज चेंडूंवर सराव करताना दिसत आहे.

विराट कोहली (Virat Kohli) भारताचा सध्याचा अव्वल फलंदाज असला तरी अलीकडे तो फॉर्ममध्ये नाही. आणि २०२४ मध्ये सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने फक्त ४८८ धावा केल्या आहेत. तर अलीकडे १० कसोटी डावांमध्ये त्याने फक्त १२९ धावा केल्या आहेत. बोर्डर – गावसकर मालिकेत त्याला फॉर्म गवसेल अशी भारतीय संघाला आशा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.