- ऋजुता लुकतुके
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli ) मैदानावर उतरतो तोच नवीन विक्रम करण्यासाठी. म्हणजे तो फलंदाजीच करत असला तरी त्यातून नवीन विक्रम घडतच असतात. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतलेला विराट आल्या आल्या आपला फॉर्म दाखवून देत आहे. (Virat Kohli )
(हेही वाचा- Archana Patil : काँग्रेसला पुन्हा मोठा झटका; डॉ. अर्चना पाटील यांचा भाजपात प्रवेश)
कोलकाता संघाविरुद्ध बंगळुरूचा पराभव झाला असला तरी विराटने या सामन्यात ५९ चेंडूंत ८३ धावा केल्या. यात ५ षटकारही खेचले. त्याचबरोबर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (RCB) सगळ्यात जास्त षटकार खेचणारा फलंदाज ठरला आहे. विराटचे एकूण षटकार आहेत २४१. आणि त्याने षटकारांच्या बाबतीत ख्रिस गेलला मागे टाकलं आहे. विराट कोहली (Virat Kohli ) आयपीएल सुरू झाल्यापासून एकाच फ्रँचाईजीसाठी खेळला आहे. त्यामुळे एकाच संघासाठी सर्वाधिक षटकार त्याच्या नावावर आहेत. तर ख्रिस गेल २०११ च्या हंगामापासून बंगळुरू (RCB) संघाकडून खेळायला लागला. त्यामुळे त्याचे षटकार कोहलीपेक्षा जास्त असले तरी ते एकाच संघासाठी केलेले नाहीत. (Virat Kohli )
बंगळुरू फ्रँचाईजीसाठी सर्वाधिक षटकार
-
विराट कोहली (२४१)
-
ख्रिस गेल (२३९)
-
एबी डिव्हिलिअर्स (२३८)
-
ग्लेन मॅक्सवेल (६७)
-
फाफ दू प्लेसिस (५०)
कोलकाता विरुद्धच्या (KKR) सामन्यात विराटने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही (MS Dhoni) मागे टाकलं आहे. धोणीचे आयपीएलमध्ये २३९ षटकार आहेत. या यादीत सर्वोत्तम आहे तो वादळ अशी ओळख असलेला ख्रिस गेल (Chris Gayle). कोलकाता नाईट रायडर्स (KKR), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज अशा तीन फ्रँचाईजींसाठी खेळताना त्याने एकूण ३५७ षटकार खेचले आहेत.
(हेही वाचा- IPL 2024, RCB vs KKR : यजमान बंगळुरूवर कोलकाताचा दिमाखदार विजय )
King Kohli got going once again and scored an exquisite 83*(59) 👏👏
🎥 WATCH the knock here 🔽 #TATAIPL | #RCBvKKRhttps://t.co/ARKDlxO2qY
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2024
आयपीएलमधील सगळ्यात जास्त षटकार,
-
ख्रिस गेल (३५७)
-
रोहित शर्मा (२६१)
-
एबी डिव्हिलिअर्स (२५१)
-
विराट कोहली (२४१)
-
महेंद्रसिंग धोनी (२३९)
(हेही वाचा- Rameshwaram Cafe Blast : रामेश्वर कॅफे स्फोटाच्या २ आरोपींचे फोटो जारी; माहिती देणाऱ्यांना १० लाखांचे बक्षीस)
विराट कोहलीने (Virat Kohli ) आतापर्यंत यंदाच्या आयपीएलमध्ये २ अर्धशतकं आणि एक तीसच्या वर धावांची खेळी साकारली आहे. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर विराटने ऑरेंज कॅप आपल्याकडे राखली असून तीन सामन्यांत त्याच्या १८१ धावा झाल्या आहेत त्या ९० च्या सरासरीने.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community