Virat Kohli : विराट कोहलीची कसोटी कारकीर्दीची १३ वर्षं पूर्ण

Virat Kohli : या कालावधीत ११३ कसोटींत विराटने ८,८४८ धावा केल्या आहेत

134
Virat Kohli : विराट कोहलीची कसोटी कारकीर्दीची १३ वर्षं पूर्ण
Virat Kohli : विराट कोहलीची कसोटी कारकीर्दीची १३ वर्षं पूर्ण
  • ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेट संघ सध्या टी-२० विश्वचषकासाठी बार्बाडोसला ब्रिजटाऊन इथं आहे. अफगाणिस्तान विरुद्ध सुपर ८ चा सामना भारताने गुरुवारी जिंकला आहे. या मैदानापासून १,९७६ किलोमीटर दूर आहे जमैका. तिथे बरोबर १३ वर्षांपूर्वी विराट कोहलीने (Virat Kohli) आपली कसोटी कारकीर्द सुरू केली होती. भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होता. आणि पहिली कसोटी किंग्जटन ओव्हलला सबिना पार्कवर होती. विराटही ही पहिली आंतरराष्ट्रीय कसोटी. आधीच्या एकदिवसीय मालिकेत विराटची कामगिरी चांगली होती. ती पाहूनच त्याला भारताचा २६७ वा कसोटीपटू म्हणून कसोटी कॅपही प्रदान करण्यात आली. (Virat Kohli)

(हेही वाचा- International Yoga Day: जगातील वरिष्ठ नेते जेव्हा संधी मिळते तेव्हा माझ्याशी योगाविषयी चर्चा करतात, पंतप्रधान योग कार्यक्रमानिमित्त म्हणाले…)

भारतीय संघाने ही कसोटी ६८ धावांनी जिंकली होती. पण, विराट दोन्ही डावांत ५ आणि १५ धावा करू शकला. (Virat Kohli)

 या कसोटी मालिकेत बॅटने शांत असलेला विराट नंतर जो सुटला तो अव्याहत चांगली कामगिरी करत आहे. आतापर्यंत ११३ कसोटींत ८,८४८ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी आहे ४९.१५ धावांची. सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे नाबाद २५४ आणि यात त्याने २९ शतकं तर ७ द्विशतकं ठोकली आहेत. भारतासाठी तो चौथा सर्वात जास्त कसोटी धावा करणारा फलंदाज आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) (१५,९२१), राहुल द्रविड (Rahul Dravid) (१३,२६५) आणि सुनील गावसकर (Sunil Gavaskar) (१०,१२२) हे तीन खेळाडू विराटच्या पुढे आहेत. (Virat Kohli)

(हेही वाचा- Pankaja Munde यांचं राजकीय पुनर्वसन होणार? देवेंद्र फडणवीस यांनी नाव सुचवल्याची माहिती)

२०१४ मध्ये विराटने महेंद्रसिंग धोनीकडून (MS Dhoni) संघाचं नेतृत्व स्वीकारलं. यशाच्या टक्केवारीच्या बाबतीत तो भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. ६८ कसोटींत त्याने भारताचं नेतृत्व केलं. यातील ४० जिंकल्या आहेत. तर १७ कसोटीत पराभव पत्करला आहे. (Virat Kohli)

 पारंपरिक खेळाडूंप्रमाणे विराटही कसोटी क्रिकेटला सर्वोत्तम मानतो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटीत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ७१ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर भारताने सातत्याने कसोटी विजय मिळवले. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला. न्यूझीलंडने इथं भारताचा पराभव केला होता. जानेवारी २०२२ मध्ये विराटने कप्तानी सोडली. (Virat Kohli)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.