- ऋजुता लुकतुके
राष्ट्रीय संघ असू दे, नाहीतर आयपीएलची फ्रँचाईजी. विराट कोहली (Virat Kohli) मैदानावर उतरला तर एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० प्रकारातही नवीन विक्रम रचले जात असतात. प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्दीमुळे विराट क्रिकेटमधील विक्रमांच्या पुस्तकात जवळ जवळ प्रत्येक पानावर आहे. आयपीएलमधील पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात विराटने ७७ धावा करत विजयात मोलाची कामगिरी बजावली. (Virat Kohli)
(हेही वाचा- Navneet Rana : अमरावतीसाठी भाजपाचा प्लान बी तयार; नव्या उमेदवारांची चाचपणी सुरु)
पण, त्यापूर्वीच बंगळुरूचा संघ गोलंदाजी करत असताना विराटने आणखी एका विक्रमला गवसणी घातली. विराट आता टी-२० प्रकारात सगळ्यात जास्त झेल टिपणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. कव्हर्समध्ये उभा असलेल्या कोहलीने पंजाबच्या जॉनी बेअरस्टोचा झेल घेऊन त्याला बाद केलं. कोहलीचा हा १७३ वा टी-२० झेल होता. आणि त्याने सुरेश रैनाला (Suresh Raina) मागे टाकलं. (Virat Kohli)
c Kohli b Siraj 🤝@RCBTweets have an early opening breakthrough!#PBKS lose Jonny Bairstow.
Follow the Match ▶️ https://t.co/cmauIj3e0o#TATAIPL | #RCBvPBKS pic.twitter.com/HAx5jhbrTZ
— IndianPremierLeague (@IPL) March 25, 2024
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर १६७ झेल आहेत. तर मनिष पांडे (Manish Pandey) (१४६) आणि सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) (१३६) हे क्षेत्ररक्षक पहिल्या पाचांत आहेत. कोहलीने फलंदाजीचा नवीन विक्रमही या हंगामात सर केला आहे. टी-२० प्रकारात १२,००० धावांचा पल्ला त्याने चेन्नई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पूर्ण केला. (Virat Kohli)
(हेही वाचा- Arvind Kejriwal : केजरीवाल यांचे पैशाच्या बदल्यात दहशतवाद्याला सोडण्याचे आश्वासन; गुरपतवंत सिंग पन्नूचा दावा)
ही कामगिरी करणारा तो फक्त पहिला भारतीय आहे. ३७७ टी-२० सामन्यांमध्ये ३६० डाव तो खेळला आहे. आणि यात त्याच्या नावावर ८ शतकं आणि ९१ अर्धशतकं जमा आहेत. टी-२० प्रकारातील १२,००० धावांपैकी ४,०३७ धावा या भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत केलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकारात त्याने एक शतक ठोकलं आहे. बाकी धावा दिल्ली, आयपीएल (IPL) फ्रँचाईजीकडून केल्या आहेत. (Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community