Virat Kohli : सचिनचा ‘हा’ विक्रम मोडण्यासाठी विराटला हव्या आणखी ५८ धावा

Virat Kohli : सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत विराट सचिनच्या मागोमाग आहे 

155
Virat Kohli : विराट कोहलीचं ऑस्ट्रेलियातील लाडकं शतक कुठलं?
Virat Kohli : विराट कोहलीचं ऑस्ट्रेलियातील लाडकं शतक कुठलं?
  • ऋजुता लुकतुके

यावर्षी जून महिन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय टी-२० मधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्यामुळे आता तो एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन प्रकारात खेळताना दिसणार आहे. विराट कोहलीची नेहमी सचिन तेंडुलकरशी (Sachin Tendulkar) तुलना होते. सर्वाधिक शतकांच्या बाबतीत विराट सचिनपेक्षा अजून २० शतकांनी मागे आहे. आणि शतकांची ही तफावत भरून काढायला विराटला आणखी काही वर्ष लागतील. पण, एका बाबतीत तो सचिनला मागे टाकू शकतो. बांगलादेश विरुद्ध विराटने आणखी ५७ धावा जमवल्या की, विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील २७,००० धावा पूर्ण करेल. आतापर्यंत सचिन २७,००० धावा सर्वात जलद पूर्ण करणारा फलंदाज होता. ती जागा आता विराट घेऊ शकेल. कारण, सचिनने यासाठी ६२३ डाव घेतले होते. विराट आतापर्यंत ५९१ डाव खेळला आहे. विराटच्या नावावर आहेत २६,९४२ धावा.

(हेही वाचा- Aus vs Eng, 1st T20 : ३ चौकार, ३ षटकार मारत ट्रेव्हिस हेडने एका षटकात वसूल केल्या ३० धावा )

इतकंच नाही तर विराटकडे आणखी एक संधी आहे. बांगलादेश विरुद्ध त्याने या ५८ धावा केल्या तर क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात ६०० पेक्षा कमी डावांत २७,००० आंतरराष्ट्रीय धावा करणारा विराट हा पहिलाच फलंदाज असेल. सचिन तेंडुलकर सोडला तर रिकी पाँटिंग आणि कुमार संगकारा या इतर दोन फलंदाजांनी क्रिकेटमध्ये २७,००० धावा केल्या आहेत. (Virat Kohli)

(हेही वाचा- Bhandara Flood : जनता पुराने त्रस्त; काँग्रेस खासदार रील बनवण्यात व्यस्त)

बांगलादेश विरुद्धची पहिली कसोटी १९ सप्टेंबरला सुरू होत आहे. त्यावेळी विराटला हा विक्रम मोडण्याची संधी असेल. क्रिकेट जगतात सध्या आफ्रो-आशियाई स्पर्धेची तयारीही सुरू आहे. आशिया इलेव्हन विरुद्ध आफ्रिका इलेव्हन असा हा सामना पूर्वी रंगत असे. यात भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघात खेळत असल्यामुळे लोकांना याची उत्सुकता होती. आता आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत या चषकावर पुन्हा एकदा चर्चा झाली आहे. आफ्रो – आशियाई करंडकाची मालिका झाली तर पाकिसतानचा बाबर आझम आणि विराट कोहली एकाच संघात मधल्या फळीत खेळताना दिसतील. (Virat Kohli)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.