Virat Kohli : ‘विराट, रोहितला एकदिवसीय प्रकारात चांगला सूर गवसेल’ – संजय बांगर 

Virat Kohli : यापूर्वी संजय बांगर भारतीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक होते

28
Virat Kohli : ‘विराट, रोहितला एकदिवसीय प्रकारात चांगला सूर गवसेल’ - संजय बांगर 
Virat Kohli : ‘विराट, रोहितला एकदिवसीय प्रकारात चांगला सूर गवसेल’ - संजय बांगर 
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आणि कसोटीऐवजी एकदिवसीय क्रिकेटचा झालेला बदल विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांसाठी लाभदायी ठरेल. आणि भारतीय संघासाठीही ते चांगलं असेल असा विश्वास माजी फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी बोलून दाखवला आहे. ‘विराट आणि रोहित, दोघांनीही एकदिवसीय क्रिकेटमध्ये यापूर्वी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. आणि आताही फॉर्म सापडण्यासाठी ही दोघांना चांगली संधी आहे. एकदिवसीय मालिकेत दोघांना चांगला फॉर्म गवसू शकतो. आणि चॅम्पियन्स करंडकासाठी हीच खरी भारतीय संघाची तयारी असेल,’ असं संजय बांगर यांनी बोलून दाखवलं आहे. (Virat Kohli)

(हेही वाचा- )

मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध झालेली मालिका आणि पाठोपाठ ऑस्ट्रेलियातही या दोघा फलंदाजांनी पुरेशा धावा केलेल्या नाहीत. तर विराट कोहली वारंवार उजव्या यष्टीबाहेर जाणारा चेंडू मारताना बाद झाला आहे. या एकाच पद्धतीने तो ऑस्ट्रेलियात एकूण आठदा बाद झाला. त्यानंतर अलीकडे रणजी सामन्यातही तो बॅट आणि पॅडमध्ये मोठं अंतर ठेवून खेळला. आणि फसलेल्या या फटक्यावर ६ धावांतच त्रिफळाचित झाला. सातत्यपूर्ण धावा होत नाहीएत, या बरोबरच ज्या पद्धतीने विराट बाद होतोय, त्यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. (Virat Kohli)

 तर रोहित ५ डावांमध्ये फक्त ३१ धावा करू शकला आहे. त्यामुळे रोहितच्या तर निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. अशावेळी चॅम्पियन्स करंडकात भारताला बाद फेरीपर्यंत मजल मारायची असेल तर दोघांपैकी निदान एकाला दिशादर्शकाची भूमिका निभावावी लागणार आहे. ‘रोहित आणि विराट, दोघंही एकदिवसीय क्रिकेटमधील ऑलटाईम ग्रेट खेळाडूंच्या यादीतील दिग्गज खेळाडू आहेत. ते या यादीत आताही राहतील. एकदिवसीय क्रिकेटमध्येच दोघांना सूर सापडण्याची जास्त आशा आहे,’ असं बांगर यांनी स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर बोलताना म्हटलं आहे. (Virat Kohli)

(हेही वाचा- )

संजय बांगर यांनी विराट कोहलीच्या फलंदाजीवर प्रशिक्षक असताना मदत घेतली आहे. आणि आताही ऑस्ट्रेलियातून परतल्यावर विराटने फलंदाजीसाठी बांगर यांचाच सल्ला घेतला होता. दोघांनी मुंबईत २ दिवस एकत्र सरावही केला आहे. २०१८ पर्यंत विराट कोहली फलंदाज म्हणून आपली सर्वोत्तम कामगिरी करत होता. आणि तेव्हाच्या कामगिरीचं श्रेय विराटने नेहमीच संजय बांगर यांना दिलं आहे. विराट आणि रोहित यांनी नागपूरमध्ये भारतीय संघाबरोबर फलंदाजीचा जोरदार सराव केला आहे. आता मैदानातील कामगिरी कशी होते हे महत्त्वाचं आहे.  (Virat Kohli)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.