Virat Kohli vs Rajat Patidar : दिल्ली विरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहली रजत पाटिदारवर नाराज आहे का?

Virat Kohli vs Rajat Patidar : विराट सामन्यादरम्यान प्रशिक्षक दिनेश कार्तिकशी चर्चा करताना दिसला. 

62
Virat Kohli vs Rajat Patidar : दिल्ली विरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहली रजत पाटिदारवर नाराज आहे का?
  • ऋजुता लुकतुके

रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरूचा संघ गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सची घोडदौड रोखू शकला नाही. बंगलुरूच्या १६३ धावांचा पाठलाग करताना सुरुवातीला दिल्लीने ४ गडी झटपट गमावले होते. पण, त्यानंतर के. एल. राहुल आणि ट्रिस्टियन स्टब्ज यांनी नाबाद भागिदारी रचून दिल्लीला विजयी केलं. या सामन्यात बंगळुरूचं क्षेत्ररक्षण सुरू असतानाच विराट कोहली कर्णधार रजत पाटिदारच्या काही निर्णयांवर नाराज दिसला. त्याने सामन्यानंतर आपली नाराजी प्रशिक्षक रजत पाटिदारशी बोलूनही दाखवली. (Virat Kohli vs Rajat Patidar)

तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट रजत पाटिदारला वगळून एकट्या कार्तिक आणि भुवनेश्वर कुमारशी बोलताना दिसतोय. बंगळुरूची फलंदाजी तितकीशी चालली नाही आणि संघाने निर्धारित २० षटकांत त्यांनी ७ बाद १६३ धावा केल्या. त्यानंतर सुरुवातीच्या षटकांत त्यांनी दिल्लीच्या फलंदाजांना ५८ धावांत बाद केलं होतं. पण, त्यानंतर के एल राहुल आणि स्टब्ज यांनी अधिक पडझड तर टाळलीच. वर भराभर धावा वाढवत दिल्लीला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं. त्यानंतर विराट कोहली दिनेश कार्तिकशी तावातावाने काहीतरी बोलताना दिसतोय. पण, रजत पाटिदार कर्णधार असूनही त्याच्याशी थेट बोलणं विराटने टाळलेलं दिसतंय. त्यामुळे विराट रजत पाटिदारवरच नाराज असल्याचं सोशल मीडियात बोललं जाऊ लागलं आहे. (Virat Kohli vs Rajat Patidar)

(हेही वाचा – Tahawwur Rana च्या हातात-पायात बेड्या, कंबरेत साखळी ; अमेरिकेने एनआयएकडे सोपवतानाचा पहिला फोटो आला समोर)

फक्त कार्तिकच नाही तर विराट भुबनेश्वर कुमारशीही बोलतोय. पण, रजत पाटिदारशी तो चर्चा करताना दिसत नाही. त्यामुळे विराटच्या मनात नेमकं काय होतं, यावर आता सोशल मीडियावरच चर्चा सुरू झाली आहे. सामना संपल्यानंतर रजत पाटिदारने १ बाद ८० वरून ४ बाद ९० अशी संघाची अवस्था झाली यावरही भाष्य केलं. ते विराटला रुचलं नसावं असा अंदाजही काहींनी व्यक्त केला आहे. (Virat Kohli vs Rajat Patidar)

दिल्लीचा फलंदाज के. एल. राहुलने ५३ चेंडूंत नाबाद ९३ धावा करत संघाला विजयी केलं. उलट बंगळुरूचे फलंदाज त्याच खेळपट्टीवर अपयशी ठरले. पण, सामन्यानंतर विराट आणि कार्तिकमधील संभाषण लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘विराट आता कर्णधार नाही, तरीही त्याने कर्णधाराशी न बोलता प्रशिक्षकाशी थेट बोलण्याची भूमिका का घेतली,’ यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. आयपीएल गुणतालिकेत आता दिल्लीचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आणि बंगळुरू संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. (Virat Kohli vs Rajat Patidar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.