-
ऋजुता लुकतुके
विराट कोहलीला (Virat Kohli) भारतासाठी २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकायचा आहे. किंग कोहलीने स्वत: अलीकडेच एका जाहीर मुलाखतीत ही इच्छा बोलून दाखवली आहे. ३६ वर्षीय दिग्गज क्रिकेटपटूने आतापर्यंत २०११ चा एकदिवसीय विश्वचषक, २०१३ आणि २०२४ चे चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy) आणि २०२४ चा टी-२० विश्वचषक (T20 World Cup) जिंकला आहे. आता तुझं पुढचं उद्दिष्ट काय आहे, असा प्रश्न विचारल्यावर, ‘मला पुढील विश्वचषक जिंकायचा आहे,’ असं उत्तर विराटने (Virat Kohli) जराही वेळ न दवडता दिलं. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला. पण, अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाला होता. या स्पर्धेत कोहलीने ११ सामन्यांत ९५ धावांच्या सरासरीने ७६५ धावा केल्या होत्या. आणि तो मालिकावीर ठरला होता.
(हेही वाचा – दोन महिन्यात राज्याचे नाट्यगृहधोरण आणणार; मंत्री Ashish Shelar यांची घोषणा)
Question: Seeing In The Present, Any Hints About The Next Big Step?
Virat Kohli Said: The Next Big Step? I Don’t Know. Maybe Try To Win The Next World Cup 2027.🏆🤞 pic.twitter.com/aq6V9Xb7uU
— virat_kohli_18_club (@KohliSensation) April 1, 2025
(हेही वाचा – Prayagraj मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; आमिर, शाखरूखसह तिघांना अटक)
२०२४ साली भारतीय संघाने टी-२० विश्वचषक (T20 World Cup) जिंकल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-२० प्रकारातून निवृत्ती पत्करली होती. मागोमाग रवींद्र जाडेजानेही (Ravindra Jadeja) निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर गेल्यावर्षी भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडकावर (Champions Trophy) पूर्ण वर्चस्व गाजवत ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेत विराट आणि रोहितचीही कामगिरी चांगली झाली. त्यामुळे दोघांनाही आणखी खेळायची उमेद मिळाली आहे. दोघांनाही २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळण्याची इच्छा असल्याचं समजतंय. ही विश्वचषक स्पर्धा सुरू होईल तेव्हा रोहित शर्मा (Rohit Sharma) ४० वर्षांचा झालेला असेल.
२०२५ चा आयपीएल (IPL) हंगाम सुरू होण्यापूर्वीही विराटने निवृत्तीबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली होती. ‘काळजी करू नका. मी कुठलीही वेगळी घोषणा करणार नाहीए. सगळं छान सुरू आहे. आणि मला क्रिकेट खेळायला अजूनही आवडतंय,’ असं विराट आरसीबी फ्रँचाईजीच्या हंगामपूर्व कार्यक्रमात म्हणाला होता. ‘मी काही मिळवण्यासाठी खेळत नाहीए. पण, जोपर्यंत खेळातून मला आनंद मिळेल, मी मनोरंजन करत राहीन आणि स्पर्धात्मक बाणा कायम असेल तोपर्यंत मी खेळणार आहे,’ असं शेवटी विराट (Virat Kohli) म्हणाला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community