Virat Kohli Wax Statue : जयपूरच्या संग्रहालयात विराट कोहलीचा मेणाचा पुतळा

Virat Kohli Wax Statue : सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीनंतर विराट हा तिसरा क्रिकेटपटू आहे. 

208
Virat Kohli Wax Statue : जयपूरच्या संग्रहालयात विराट कोहलीचा मेणाचा पुतळा
  • ऋजुता लुकतुके

जागतिक हेरिटेज दिवसाच्या (World Heritage Day) निमित्ताने जयपूरच्या वॅक्स संग्रहालयात विराट कोहलीच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. या संग्रहालयाचे संस्थापक आणि संचालक अनुप श्रीवास्तव यांनी पुतळ्याचं उद्घाटन केलं. संग्रहालयाला भेट देणाऱ्या असंख्य तरुणांची मागणी आज पूर्ण करत आहोत, असं वक्तव्य केलं. जयपूरच्या नाहरगड किल्ल्यात हे संग्रहालय आहे आणि इथं ४४ प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे मेणाचे पुतळे आहेत. (Virat Kohli Wax Statue)

सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या मागोमाग विराट कोहली (Virat Kohli) या तिसऱ्या क्रिकेटपटूचा पुतळा इथं विराजमान झाला आहे. (Virat Kohli Wax Statue)

(हेही वाचा – Israel Iran War: इस्रायल-इराण युद्धावर काय म्हणाले एलॉन मस्क ?)

विराटचा हा पुतळा ३५ किलो वजनाचा आहे आणि निळी जर्सी घातलेल्या विराटने (Virat Kohli) दोन्ही हातात बॅट पकडली आहे. जवळ जवळ दोन महिन्यात हा पुतळा तयार करण्यात आला आहे. नाहरगड येथील या मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयात जवाहरलाल नेहरू, एपीजे अब्दुल कलाम, भगत सिंग, कल्पना चावला, अमिताभ बच्चन आणि मदर तेरेसा यांचे पुतळे आहेत. (Virat Kohli Wax Statue)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.