-
ऋजुता लुकतुके
विराट कोहलीसाठी (Virat Kohli) हा ऑस्ट्रेलियाचा दौरा आव्हानात्मक ठरला. पहिल्या पर्थ कसोटीतील शतक सोडलं तर एरवी ८ डावांमध्ये विराट (३५ आणि १७ वगळता) एकेरी धावसंख्येतच बाद झाला. मालिकेत त्याच्या एकूण धावा होत्या फक्त १९०. विराट कोहली (Virat Kohli) ८ डावांमध्ये डाव्या यष्टीबाहेरचा चेंडू खेळताना बाद झाला. आणि ही त्याच्यासाठी वारंवार डोकेदुखी ठरत आहे. आता मालिका संपल्यानंतर विराट कोहलीचा (Virat Kohli) खास मित्र आणि दक्षिण आफ्रिका दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलिअर्सने (AB de Villiers) विराटला मित्रत्वाचा सल्ला दिला आहे.
डिव्हिलिअर्सने (AB de Villiers) एक्सवर शेअर केलेल्या एका व्हीडिओत विराटला मन शांत करण्यास सांगितलं आहे. ‘मन रिसेट कर. आणि मैदानावर खेळाडूंशी वाद घालू नकोस,’ असं डिव्हिलिअर्सचं (AB de Villiers) विराटला सांगणं आहे. ‘प्रत्येक चेंडूनंतर विराटने आपलं मन रिसेट करायला हवं. नवीन चेंडूसाठी स्वत:ला तयार करायला हवं. मैदानावरील इतर खेळाडूंकडे त्याने लक्ष द्यायला नको होतं. एरवी तो लढवय्या आहे. त्यामुळे त्याला असे वाद आवडतात. पण, जेव्हा तुम्ही स्वत: चांगल्या फॉर्ममध्ये नसता, तेव्हा तरी अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. भांडणाचा परिणाम असा झाला की, प्रेक्षक त्याच्या विरोधात गेले. आणि विराट त्यामुळे आणखी डिवचला गेला,’ असं डिव्हिलिअर्सने (AB de Villiers) म्हटलं आहे.
(हेही वाचा – Dadar Railway Station मध्ये घडली गंभीर घटना; माथेफिरूने कापले तरुणीचे केस)
Australia have won the #BGT to book a spot in the #WTCFinal against my Proteas. Hop on to today’s #360Live and let’s talk about what went wrong for India and what else is on in the world of cricket… https://t.co/OydSB92xZE
— AB de Villiers (@ABdeVilliers17) January 5, 2025
(हेही वाचा – तुम्ही कसले पालक आहात?; मुलीच्या गर्भपाताची मागणी करणाऱ्या पालकांना Mumbai High Court ने खडसावले )
कोहलीतील लढवय्येपणा आणि खेळासाठीची त्याची तडफ डिव्हिलिअर्सला (AB de Villiers) आवडते. पण, त्याचवेळी खेळाव्यतिरिक्त इतर गोष्टी टाळाव्यात, असं त्याला वाटतं. यंदाच्या आयसीसी कसोटी अजिंक्यपद हंगामात विराटने १७ कसोटींत ७६१ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी आहे ३२ धावांची. यात त्याने २ शतकं आणि ३ अर्धशतकं ठोकली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे १२१. आधुनिक दिग्गज खेळाडीसाठी ३२ ही सरासरी नक्कीच चांगली नाही. त्याची संपूर्ण कारकीर्दीतील सरासरीही त्याने ५० च्या खाली घसरली.
खासकरून, २०२४ मध्ये विराटने (Virat Kohli) २२ च्या सरासरीने अवघ्या ३९२ धावा केल्या आहेत. एकमेव शतक आणि एकमेव अर्धशतक त्याच्या नावावर आहे. २०२० पासून विराटचा कसोटीतील फॉर्म ढासळायला सुरुवात झाली. आणि या कालावधीत त्याने ३० च्या सरासरीने २,०२८ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे १८६.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community