-
ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियातील यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे विराट कोहली (Virat Kohli). इथे खेळलेल्या १३ कसोटींत त्याने ६ शतकं आणि ४ अर्धशतकांच्या सहाय्याने १,३५२ धावा केल्या आहेत त्या ५४ धावांच्या सरासरीने. ऑस्ट्रेलियात यशस्वी झालेल्या भारताच्या निवडक ५ फलंदाजांपैकी विराट कोहली (Virat Kohli) एक आहे. त्याच्या इथल्या सर्वोत्तम खेळींपैकी विराट कोहलीची (Virat Kohli) लाडकी खेळी कुठली असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. तर अलीकडेच बीसीसीआने (BCCI) प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओत विराटने २०१८ च्या दौऱ्यात पर्थ इथं केलेल्या १२३ धावांचा उल्लेख केला आहे.
२०१८-१९ च्या बोर्डर – गावसकर चषकात पर्थ इथं विराट कोहलीने (Virat Kohli) १४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १२३ धावा केल्या होत्या. विराटच्या या कामगिरीनंतरही भारताने ही कसोटी गमावली. पण, विराटने जगातील एक अतीवेगवान आणि उसळत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेळपट्टीवर ही कामगिरी केली होती. त्यामुळेच असेल कदाचित ही खेळी विराटच्या लक्षात राहिली आहे.
(हेही वाचा – Maharashtra Election 2024: आचारसंहितेच्या काळात तब्बल ६६० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; २०१९च्या तुलनेत पाचपट आहे संपत्ती)
#TeamIndia Questions..
..And Answers❗️
📸 Presenting India’s Headshots Session ft. 𝗔𝘀𝗸 𝘁𝗵𝗲 𝗡𝗲𝘅𝘁 𝗢𝗻𝗲 😎
WATCH 🎥🔽 – By @RajalArora | #AUSvIND https://t.co/POrSOOezHS
— BCCI (@BCCI) November 18, 2024
(हेही वाचा – Kho Kho Tournament : मुंबईतील मानाच्या महर्षी दयानंद आंतरमहाविद्यालयीन खो खो, कबड्डी स्पर्धेची घोषणा)
‘माझी ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम खेळी ही पर्थ मधील शतक हीच असेल. २०१८ च्या दौऱ्यात मी तिथे १२३ धावा केल्या होत्या. माझ्या आयुष्यात मी खेळलेली ती सगळ्यात आव्हानात्मक खेळपट्टी होती. त्यामुळे ते शतकही मला लक्षात राहिलं आहे,’ असं विराट या व्हिडिओत म्हणतो. कोहलीच्या त्या शतकानंतरही भारताने पर्थ कसोटी १४६ धावांनी गमावली होती.
पण, विशेष म्हणजे या मालिकेतही पहिली कसोटी भारतीय संघाने ३१ धावांनी जिंकली होती. आणि पर्थमधील १-१ अशा बरोबरीनंतर भारताने तिसरी मेलबर्न कसोटी १३७ धावांनी जिंकली. आणि पुढील सिडनी कसोटी अनिर्णित सोडवत ही मालिका २-१ ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने मिळवलेला हा पहिला मालिका विजय होता. आणि विराट कोहली (Virat Kohli) या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्वही करत होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community