-
ऋजुता लुकतुके
विराट कोहली मागची काही वर्षं खराब फॉर्मशी झगडतोय. आणि त्याच्या बॅटमधून म्हणाव्या तशा धावा होत नाहीएत. पण, तो अजूनही तरुण चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. आणि त्याची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही हे त्याला पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या लोकांना बघून कळतं. लोकांना तो फॉर्ममध्ये परतले याची खात्री आहे आणि त्यांचा पाठिंबाही विराटला आहे. भारतीय संघ कटकमधील सामना संपवून अहमदाबादला निघाला तेव्हा एका दृश्यातून हे समोर आलं. नागपूर सामन्यात दुखापतीमुळे विराट खेळला नाही. आणि कटकमध्ये तो खेळणार हे कळल्यावरच प्रेक्षकांमध्ये आनंदाने गजर झाला. पण, नेमका विराट ५ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर भारतीय संघाने सामना जिंकूनही मैदानावर सन्नाटा पाहायला मिळाला. त्यानंतर भारतीय संघ जेव्हा कटकहून अहमदाबादला जायला निघाला तेव्हा एका महिला चाहतीने विराटला मिठी मारली. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Virat Kohli)
(हेही वाचा- Ind vs Eng, 3rd ODI : रोहित शर्माने या बाबतीत सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे)
खेळाडू भुबनेश्वर विमानतळावरून अहमदाबादला जायला निघालेले असताना आधीच सुरक्षा रक्षकांना गर्दी आवरणं कठीण जात होतं. आणि त्यात विराट बसमधून उतरल्यावर तर चाहत्यांनी कल्लोळ सुरू केला. अशावेळी अचानक विराट गर्दीच्या दिशेनं वळला. आणि एका तरुण चाहतीच्या शुभेच्छा स्वीकारून त्याने तिला आलिंगन दिलं. (Virat Kohli)
That Hug 🥺❤️ pic.twitter.com/nSkwhmtZUs
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) February 10, 2025
विराटचा चाहता वर्ग भारताबरोबरच परदेशातही आहे. आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. दरम्यान, भारतीय संघ तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी आता अहमदाबादला पोहोचला आहे. १२ फेब्रुवारीला नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याची संधी भारताला असेल. (Virat Kohli)
Cuttack 🛬 Ahmedabad #TeamIndia have arrived for the Third and the Final #INDvENG ODI 👌👌@IDFCFIRSTBank pic.twitter.com/JOd2fCAkgU
— BCCI (@BCCI) February 10, 2025
भारतीय संघाच्या दृष्टीने चॅम्पियन्स करंडकापूर्वीची ही सरावाची अखेरची संधी आहे. यानंतर १५ फेब्रुवारीला भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकासाठी दुबईला रवाना होणार आहे. रोहित शर्माने कटक एकदिवसीय सामन्यात ९० चेंडूंत ११९ धावा करून आपल्या फॉर्मची चुणूक दाखवून दिली आहे. आता विराटलाही फॉर्म गवसावा अशीच भारतीय चाहत्यांची इच्छा असणार आहे. (Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community