ऋजुता लुकतुके
या विश्वचषकात विराट कोहली (Virat Kohli) खूपच चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आपल्या तडाखेबंद फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना जेरीला आणणारा विराट नेट्समध्ये गुरुवारी (२६ ऑक्टोबर) गोलंदाजी करताना दिसला. भारताचा पुढील सामना येत्या २९ तारखेला इंग्लंडबरोबर लखनौच्या एकाना स्टेडिअममध्ये होणार आहे. त्या पूर्वी भारतीय संघाच्या नेट्समध्ये विराटने एक तास गोलंदाजी केली.
शुभमन गिलला तो (Virat Kohli) फिरकी चेंडू टाकत असतानाचे फोटो सोशल मीडियावर आल्या आल्या व्हायरल झाले आहेत.
Virat Kohli bowling to Shubman Gill in the nets. pic.twitter.com/jBeLgAx9OV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 26, 2023
भारताने आतापर्यंत खेळलेले पाचही साखळी सामने जिंकले आहेत. आणि १० गुणांसह गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल आहे. संघाचा उपान्त्य फेरीतील प्रवेशही जवळपास निश्चित आहे. संघाच्या या कामगिरीत विराट कोहलीने (Virat Kohli) दमदार कामगिरी बजावली आहे. धावांचा पाठलाग करण्यात माहिर असलेल्या विराटने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ५ सामन्यांत ३५४ धावा केल्या आहेत त्या ११८ पेक्षा जास्तच्या सरासरीने. दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक ४०५ धावा करून त्याच्या पुढे आहे.
याशिवाय विराट कोहलीला (Virat Kohli) आता आणखी एक विक्रम खुणावतोय. बांगलादेश विरुद्ध ४८ वं एकदिवसीय शतक ठोकल्यानंतर आता विराटला प्रतीक्षा आहे ती ४९ व्या शतकासह सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची. हा योग या विश्वचषक स्पर्धेत जुळून आला तर भारतीय संघालाही त्याचा फायदाच होणार आहे.
(हेही वाचा – Asian Para Games 2023 : आशियाई पॅरालिम्पिक खेळात भारताचा पदकांचा नवा उच्चांक, आतापर्यंत ८२ पदकं)
न्यूझीलंड विरुद्धच्या शेवटच्या सामन्यातच विराटला (Virat Kohli) बरोबरीची संधी होती. पण, तो ९५ धावांवर बाद झाला. या सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्स वाहिनीशी बोलताना विराटने आपल्या खेळाकडे बघण्याच्या दृष्टिकोणाविषयी भाष्य केलं होतं. आपण अचूकतेपेक्षा सुधारणेवर भर देतो, असं तो म्हणाला होता.
‘मी कालच्या पेक्षा आज कसा चांगला खेळेन आणि प्रत्येक नेट्समध्ये, सामन्यात आणि प्रत्येक हंगामात मी काय सुधारणा करतो, यावर माझं सगळं लक्ष असतं. मी परिपूर्णतेपेक्षा किंवा अचूकतेपेक्षा सुधारणेला जास्त महत्त्व देतो,’ असं विराटचं (Virat Kohli) म्हणणं होतं. खेळात सुधारणेला वाव हवा. कामगिरी हेच उद्दिष्टं ठेवलं तर ते साध्य केल्यावर खेळाची मजा कमी होईल, असं त्याला वाटतं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community