-
ऋजुता लुकतुके
विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे भारतीय संघातील दोन स्टार खेळाडू क्रिकेटच्या मागोमाग फुटबॉलचे चाहते आहेत. भारतीय संघही अनेकदा सरावाच्या वेळी या खेळाची मजा लुटतात. विराट आणि रोहित यांनी टी-२० प्रकारातून निवृत्ती स्वीकारली आहे. त्यामुळे सध्या ते मोकळे आहेत. ऑक्टोबरच्या मध्यावर सुरू होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेची ते तयारी करतायत. तयारी दरम्यान दोघांनी फुटबॉलचा आनंद लुटलेला एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
(हेही वाचा- Sanjay Raut: हरियाणात काँग्रेसचा पराभव फाजील आत्मविश्वासामुळे; राऊतांचा सामनातून टोला)
फुटबॉल खेळतानाही विराटची चपळता, चिकाटी आणि रिफ्लेक्सेस दिसून येत होते. विराटचं कुटुंबं सध्या लंडनला आहे. विराट क्रिकेटच्या भरगच्चा कार्यक्रमामुळे सध्या भारतात आहे. (Virat Kohli)
They are literally like the Ronaldo and Messi of cricket, in a same team. 🐐🔥 pic.twitter.com/lJynWzoXD2
— ` (@cutxpull45) October 7, 2024
रोहित (Rohit Sharma) चॅरिटी सामन्यांमध्ये फुटबॉल खेळलेला आहे. तर विराट कोहली (Virat Kohli) आपल्या फाऊंडेशन मार्फत तर असे फुटबॉल सामने आयोजितही करतो. त्या सामन्यांमध्येही रोहित आणि विराट एकत्र खेळलेले आहेत. सेलिब्रिटी क्लासिको स्पर्धेतही दोघं खेळतात. क्रिकेटप्रमाणेच विराटची ऊर्जा आणि आक्रमकता फुटबॉलच्या मैदानावरही दिसते. तो चेंडूचा ताबा मिळवण्यासाठी जोमाने प्रयत्न करतो. भारतीय खेळाडू सरावादरम्यान फुटबॉल खेळतात तेव्हा विराट असलेला संघच नियमितपणे जिंकतो.
(हेही वाचा- RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेचा रेपो दर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’)
भारताची न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका ३ कसोटींची आहे. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला टी-२० मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर असेल तर ऑस्ट्रेलियाचा ५ कसोटी मालिकेचा खडतर दौरा. (Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community