-
ऋजुता लुकतुके
भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी विराट कोहलीच्या अलीकडच्या फॉर्मवर चर्चा करताना त्याची तुलना टेनिसमधील दिग्गज खेळाडू राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविचशी केली आहे. ‘जसे नदाल, फेडरर आणि जोकोविच काही काळ विजेतेपदाशिवाय राहिले तसंच विराट ६ कसोटी शतकाविना राहिला,’ असं सुनील गावसकर यांनी म्हटलं आहे. विराट कोहलीने अखेर आपला शतकांचा दुष्काळ पर्थमध्ये संपवला. (Virat Kohli)
(हेही वाचा- )
यावर बोलताना सुनील गावसकर म्हणतात, ‘शतक साजरं झालं तेव्हा मी समालोचन कक्षात होतो. माझं मत मी तेव्हाच मांडलं आहे. नदाल, फेडरर प्रभृती उपांत्य फेरीत बाद झाले की, लोक म्हणतात त्यांचा फॉर्म चांगला नाही. पण, इतर कुणी उपांत्य फेरीत जरी पोहोचलं तरी म्हणतात, किती चांगला खेळाडू आहे. उपांत्य फेरीत पोहोचला.’ विराट सारख्या खेळाडूने सातत्याने शतकं केलेली आपण पाहिली आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी तो मैदानावर उतरला की त्याच्याकडून शतकाचीच अपेक्षा असते, असं गावसकर म्हणतात. (Virat Kohli)
Hello Australia 🇦🇺
KING KOHLI has brought up his 7th Test century on Aussie soil and second at the Perth Stadium. A classic knock from the champion batter 🫡🫡
Live – https://t.co/gTqS3UPruo… #AUSvIND | @imVkohli pic.twitter.com/QHMm7vrhcw
— BCCI (@BCCI) November 24, 2024
Test Century No.30!
All hail, King Kohli 🫡👏👌
Live – https://t.co/gTqS3UPruo…… #AUSvIND pic.twitter.com/VkPr1YKYoR
— BCCI (@BCCI) November 24, 2024
जुलै २०२३ मध्ये विराटने वेस्ट इंडिजविरुदध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये शेवटचं शतक केलं होतं. त्यानंतर तो शतकाविना होता. आणि न्यूझीलंड विरुद्ध फिरकीला खेळताना त्याच्या फलंदाजीतील त्रुटी उघड झाल्या. त्यामुळे विराटवर ऑस्ट्रेलियाला निघताना दडपण वाढलं होतं. शेवटच्या ६ कसोटी डावांत मिळून त्याच्या फक्त १०२ धावा झाल्या होत्या. पण, अखेर पर्थमध्ये त्याला सूर गवसला. त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अगदी शिस्तीत उत्तर दिलं. (Virat Kohli)
(हेही वाचा- महाराष्ट्राचं सरकार कधी स्थापन होणार ? Ajit Pawar तारीख सांगत म्हणाले…)
‘दुसऱ्या डावात तो फलंदाजीला आला तेव्हापासून त्याची देहबोली वेगळी होती. शैलीतही त्याने बदल केले. हेझलवूडला मिडविकेटला मारलेले चौकार मला विशेष लक्षात राहिले आहेत. शिवाय क्रीझचा वापरही त्याने छान केला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी ऑफस्टंपवर मारा करून त्याला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. पण, विराटने तांत्रिकदृष्ट्या तोच वरचढ असल्याचं दाखवून दिलं,’ असं गावसकर विराटच्या पर्थमधील शतकावर बोलताना म्हणाले. (Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community