Virat Kohli! Who? फुटबॉलपटू रोनाल्डो म्हणतो, ‘तो विराटला ओळखत नाही’

खरंतर विराट कोहली जागतिक आयकॉन आहे. पण, अलीकडेच एका व्हायरल व्हिडिओ फुटबॉलपटू रोनाल्डो आपण विराटला ओळखत नसल्याचं सांगतो. आणि या व्हिडिओमुळे सोशल मीडिया गार झाला आहे. 

186
Virat Kohli! Who? फुटबॉलपटू रोनाल्डो म्हणतो, ‘तो विराटला ओळखत नाही’
Virat Kohli! Who? फुटबॉलपटू रोनाल्डो म्हणतो, ‘तो विराटला ओळखत नाही’
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) ओळख खरंतर भारतापूरती मर्यादित नाही. क्रिकेट विश्वापूरतीही नाही. भारता बाहेर आणि क्रिकेट बाहेरही त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. जगभरात सगळीकडे आणि कुठल्याही गोलंदाजासमोर धावा लुटण्याची त्याची हातोटी वादातीत आहे. आणि जागतिक स्तरावर तो तरुणांचा आयकॉन आहे. (Virat Kohli! Who?)

पण, गुरुवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. आणि तो बघून चाहते गार झाले. या व्हिडिओत ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डो विराट (Virat Kohli) कोण, असं विचारतोय. (Virat Kohli! Who?)

(हेही वाचा – Governor Ramesh Bais : राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्या – राज्यपालांचे माध्यमांना आवाहन)

रोनाल्डो बरोबरचा संवाद असा आहे.

प्रश्न ; तुला विराट कोहली माहीत आहे का?

उत्तर ; कोण?

प्रश्न ; विराट कोहली, भारताचा

उत्तर ; नाही

प्रश्न ; तुला विराट कोहली माहीत नाही?

उत्तर ; तो कोण आहे? खेळाडू आहे का?

प्रश्न ; तो क्रिकेट खेळतो.

उत्तर ; इथं तो फारसा लोकप्रिय नाही.

प्रश्न ; हो, पण तो सर्वोत्तम आहे. बाबर आझम सारखा आहे तो. तू त्याला पाहिलं नाहीएस का? (युट्यूबर विराटचा चेहरा मोबाईलमध्ये दाखवतो.) (Virat Kohli! Who?)

उत्तर ; अच्छा.

हा व्हिडिओ भारतात व्हायरल झाल्यानंतर अर्थातच लोकांच्या चिडलेल्या प्रतिक्रिया येत आहेत. ‘आम्हीही रोनाल्डोला ओळखत नाही.’ किंवा ‘आम्ही फक्त ख्रिस्तियानो रोनाल्डोला ओळखतो,‘ इथपासून ते ‘बॉयकॉट ब्राझील हा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू करायला हवा,’ अशा चाहत्यांच्या प्रतिक्रिया आहेत. (Virat Kohli! Who?)

विराट कोहली (Virat Kohli) सध्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान दरम्यानच्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. पहिला टी-२० सामना वैयक्तिक कारणामुळे तो खेळला नव्हता. आणि आता दुसऱ्या सामन्यासाठी इंदूरमध्ये तो संघात दाखल होईल. (Virat Kohli! Who?)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.